आरक्षणावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

आरक्षणावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

आरक्षणावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी
काँग्रेसचे नेते खासदार जयराम रमेश यांचे आव्हान
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १ ः ओबीसींना अधिक आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांची कमाल मर्यादा काढून टाकण्याच्या संदर्भात काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान काँग्रेसचे महासचिव खासदार जयराम रमेश यांनी दिले आहे.
काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात अनुसूचित जाती व जमाती व ओबीसींना आरक्षणाची भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे तामिळनाडू वगळता कोणत्याही राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही. यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचे आश्वासन काँग्रेसने मतदारांना दिले आहे. यावर भाजपची नेमकी भूमिका काय आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. आरक्षणाला विरोध नाही, अशी गुळमुळीत भूमिका चालणार नाही. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी मोदी सरकारची भूमिका काय आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला आहे. लोकांमध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर त्यांनी ते विधान मागे घेतले आहे. याचा अर्थ रा. स्व. संघाच्या भूमिकेत बदल झाला, असे नाही. रा. स्व. संघ अगदी पहिल्यापासून केवळ आरक्षण नव्हे तर राज्यघटनेच्या विरोधात होते. राज्यघटनेचा मसुदा स्वीकारल्यानंतर पाच दिवसांनी ३० नोव्हेंबर १९४९ रोजी रा. स्व. संघाचे मुखपत्र असलेले ऑर्गनायझर्स या साप्ताहिकात राज्यघटना मान्य नसल्याचे स्पष्ट केले होते. एवढेच नव्हे तर या लेखात मनुस्मृतीचे समर्थन केले होते, असा दाखला त्यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com