''चला पुस्तकांशी दोस्ती करुया’ उपक्रमाला प्रतिसाद

''चला पुस्तकांशी दोस्ती करुया’ उपक्रमाला प्रतिसाद

उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या संकल्पनेतून व सदामंगल पब्लिकेशनच्या सहकार्याने उल्हासनगर महापालिकेने महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी ‘चला पुस्तकांशी दोस्ती करूया’ या संकल्पनेवर आधारित ५० हजार पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते. मतदान ओळखपत्रधारकांना पुस्तक खरेदीवर २० तर शालेय विद्यार्थ्यांना ३० टक्के सवलत देण्यात आली होती.

आयुष्य घडवण्यासाठी पुस्तकासारखा चांगला दोस्त नाही, त्यामुळे पुस्तकांशी दोस्ती करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेतर्फे या भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यावेळी नुकतेच आयएएस झालेले उल्हासनगरकर सनदी अधिकारी अभिषेक टाले यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. या पुस्तकांच्या संगतीतूनच उल्हासनगरचे अभिषेक टाले ‘आयएएस’ झाले. आज पालिकेतर्फे त्यांचा या पुस्तकांच्या विश्वात सत्कार व्हावा, हा योगायोग आहे, असे प्रतिपादन उल्हासनगर महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख यांनी केले.

सिंधू भवनमध्ये आयोजित केलेल्या या उपक्रमाचे उद्‌घाटन आयुक्त अजीज शेख, आमदार कुमार आयलानी, सनदी अधिकारी अभिषेक टाले, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे, उपायुक्त किशोर गवस, डॉ. सुभाष जाधव, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, भाजपचे महेश सुखरामानी, लाल पंजाबी, राजू जग्यासी, पीआरपीचे प्रमोद टाले आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श
पहिल्या यशात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यात रेल्वेची सेवा केली; पण तळागाळातील नागरिकांच्या सेवेचा ध्यास असल्याने पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासाची जिद्द, चिकाटी हा आदर्श समोर ठेवला होता. त्यात आयएएस असे यश मिळाल्याचे सनदी अधिकारी अभिषेक टाले यांनी सांगितले.

भाग्यवान विजेत्या पारितोषिक
१ ते ३ मे अशा दिवसीय पुस्तक प्रदर्शनाला ५० हजारांपेक्षा जास्त मराठी, इंग्रजी, हिंदी व सिंधी पुस्तके उपलब्ध केली आहेत. पुस्तक प्रदर्शनास भेट देणाऱ्या वाचकांना १० टक्के तर ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र असणाऱ्या वाचकांना २० टक्के व शालेय विद्यार्थ्यांना ३० टक्के सवलत पुस्तक खरेदीवर देण्यात आली आहे. त्यासोबतच या पुस्तक प्रदर्शनात मतदार जनजागृतीसाठी एक प्रतिज्ञा वाचकांकडून लिहून घेतल्या असून त्यापैकी एका भाग्यवान विजेत्याला विशेष पारितोषिक देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com