लालबागमध्ये कामगारांची रॅली

लालबागमध्ये कामगारांची रॅली

लालबागमध्ये कामगारांची रॅली
सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी
कांदिवली, ता. २ (बातमीदार) ः महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने भारत माता सिनेमा, लालबाग येथून गिरणी कामगार, घरेलू कामगा, ई.पी.एस. ९५ पेन्शनधारक कामगारांनी रॅली काढली होती. हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन सरकारच्या धोरणांविरोधात कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या रॅलीमध्ये पाठिंबा देण्यासाठी एन.टी.सी.एस सी., एस.टी संघटनेचे बबन मोरे, मुंबई गिरणी कामगार युनियनचे प्रतिनिधी निंबाळकर, हेमन धागा जनकल्याण फाऊंडेशन, गिरणी कामगार सेनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कॉ. विजय कुलकर्णी, कॉ. उदय भट, बबन मोरे, अॅड. निंबाळकर यांनी उपस्‍थितांना मार्गदर्शन केले. भाषणामध्ये वाढती महागाई, शिक्षण, आरोग्य, बेकारी, शेतकरी आत्‍महत्‍या, भ्रष्टाचार, पेन्शनमध्ये वाढ करावी, घरेलू कामगारांना न्याय द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्‍या. त्यानंतर महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये व कामगारांच्या लढ्यासाठी बलिदान देणाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. या रॅलीत २०० कामगार सहभागी झाले होते.

गिरणी कामगारांना मुंबईत जागा द्या!
जिल्ह्याच्या भागात गिरणी कामगारांना घरे देण्याच्या सरकारने घेतलेल्या शासन निर्णयाचा यावेळी निषेध करण्यात आला. सरकारने निर्णय रद्द करून गिरणी कामगार व त्‍यांच्या वारसांना मुंबईत जागा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com