रसायनीत धार्मिक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

रसायनीत धार्मिक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

रसायनीत धार्मिक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम
रसायनी (बातमीदार) : रसायनीतील चांभार्ली येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिराच्‍या चौदावा वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला एकनाथी भागवत पारायण सोहळा उत्साहात पार पडला. गुरुवारी (ता. २) काल्याच्या कीर्तनाने या धार्मिक सोहळ्याचा समारोप झाला. धार्मिक सोहळ्यानिमित्त मंदिरात दर दिवशी सकाळी आणि दुपारी भागवत पारायण तसेच सायंकाळी हरिपाठ, रात्री हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक हभप महाराजांची कीर्तने झाली. दरम्यान, बुधवार १ मे रोजी गावातून दिंडी काढण्यात आली होती. तर मंदिरात पंधरा दिवस आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमांना परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
......................
विठ्ठल नगर येथे गोरक्षनाथाचा उत्सव
पेण (बातमीदार) : विठ्ठल नगर येथील गोरक्षनाथाचा ५०वा उत्सव सोहळा २ ते ४ मेपर्यंत तीन दिवस साजरा होणार आहे. गुरुवार, २ मे रोजी अभिषेक व साडेदहा वाजता श्रींची आरती, त्यानंतर सायंकाळी पाच वाजता रोहित म्‍हात्रे यांचे संगीत भजन आयोजित करण्यात आले आहे. रात्री साडेनऊ वाजता डोंबिवलीच्‍या हभप प्राची मंदार व्यास यांचे कीर्तन होणार आहे. रात्री १२ वाजता धनाजी म्हात्रे यांचे संगीत भजन होणार आहे. शुक्रवारी, ३ मे रोजी संध्याकाळी पाच वाजता नरेंद्र विठोबा म्हात्रे यांचा विठ्ठल- रुक्माई हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ मृदंग कार्यक्रम होणार आहे. अशा प्रकार विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
.................
महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी कामांना वेग
रसायनी (बातमीदार) : पावसाळ्यात वीजवाहिन्यांवर लगतच्या झाडांच्या फांद्या पडून वीजपुरवठ्यात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी कामांना वेग आला आहे. त्यानुसार वासांबे मोहोपाडा येथील वीज महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वाहिन्यांजवळील झाडांच्या फांद्या छाटण्याची आणि इतर दुरुस्तीचे कामे महावितरणने मंगळवारपासून सुरू केली आहेत. यामध्ये परिसरातील उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या लगतच्या झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. त्याकरिता सकाळीच वासांबे मोहोपाडा आणि चांभार्ली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावे आणि वाड्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. दरम्यान, तापमान वाढीमुळे वीजपुरवठा बंद झाल्यानंतर उकड्याने हैराण झालेल्‍या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दुपारी दोन वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
............................
अष्टमीत स्वामी सेवेकऱ्यांची हजेरी
रोहा (बातमीदार) : रोहा शहरातील अष्टमी येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचा सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यामुळे अष्टमीत सेवेकऱ्यांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. सप्ताहदरम्यान अखंड नाम, जप, यज्ञ, याग आदी धार्मिक विधी व कार्यक्रम केंद्रात पार पडणार आहेत. अष्टमी येथील दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आणि बाल सुसंस्कार केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या धार्मिक कार्यक्रमानिमित्त शेकडो सेवेकरी आपली सेवा रुजू करण्यासाठी येथे येतात. सप्ताहादरम्यान अखंड विणावादन, चरित्र सारामृत वाचन, श्री गुरुचरित्र पठण, श्री दुर्गासप्तशी पोथी पारायण, दिवसा महिलांची तर रात्री पुरुषांची प्रहरे, अग्नी प्रदीपन, नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग, मनोबोध याग, श्री चंडीयाग, श्री स्वामी याग, श्री गीताई याग, श्री रूद्रयाग याग, मल्हारी याग, बली प्रदान, पूर्णाहुती, सत्य दत्त पूजन, महाप्रसाद, औदुंबर प्रदक्षिणा आदी विविध धार्मिकविधींबरोबर मनाचे श्लोक वाचन, पसायदान, अभंग आणि सहस्रनाम वाचन केले जाणार आहे. यासाठी श्री स्वामी सेवेकरी परिश्रम घेत असून या सप्ताहाची सांगता सोमवारी ६ मे रोजी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com