१०६ हुतात्म्यांना सायकलपटू हिरेन हिसलगेकडून मानवंदना

१०६ हुतात्म्यांना सायकलपटू हिरेन हिसलगेकडून मानवंदना

१०६ हुतात्म्यांना सायकलपटू हिरेन हिसालगेकडून मानवंदना
नेरळ, ता. २ (बातमीदार) ः नेरळ येथील सायकलपटू हिरेन हिसालगे याने १ मे या महाराष्ट्र दिनाच्‍या निमित्ताने दोन तास सायकल चालवून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांना मानवंदना दिली.
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्‍या निर्मित्तीसाठी १०६ जणांना हौतात्म्य प्राप्त झाले होते; तर हजारो जखमी झाले होते. या १०६ हुतात्म्यांच्या स्मृती जागवण्यासाठी, तसेच त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नेरळ येथील सायकलपटू हिरेन हिसालगे यांनी शहरात सायकल राईड केली आहे. यावेळी आनंदाची बाब म्हणजे इतर विद्यार्थीही हिरेनसोबत जोडले गेले होते. यावेळी विविध प्रकारचे फलक, चळवळीची माहिती, चळवळीचे काही उपलब्ध फोटो, भारताचा तिरंगा ध्वज, महाराष्ट्राची ओळख असलेला स्वराज्याचा भगवा ध्वज, चळवळीची ऑडिओ क्लिप आदी सायकलवर घेऊन नेरळ पोलिस ठाणे येथून सायकलिंगला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी हिरेनने शहरातील सर्व स्मारकांना व हुतात्म्यांना अभिवादन करत सुमारे दोन तासांहून अधिक वेळ राईड करत १०६ हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी हिरेन सोबत, सुमेध विकास पारधी, आदीन अयाज अत्तार, देवांशी कैलास कुलकर्णी, श्रवण सूरज पारटे, सोजल मंगेश बिराडे, यश लक्ष्मण शिंदे, अथर्व रुपेश रसाल, योगराज लक्ष्मण शिंदे, श्रेया सूरज पारटे, संग्राम अंकुश शेळके हे सर्व विद्यार्थी सायकलिंग करत होते. हिरेनची सायकल राईड सकाळी सात वाजता नेरळ पोलिस ठाणे येथून सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर सुरू झाली. हिरेनच्या या उपक्रमाचे नेरळ शहरातून कौतुक केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com