मुरबाड विधानसभा समन्वयकपदी कालिदास देशमुख

मुरबाड विधानसभा समन्वयकपदी कालिदास देशमुख

बदलापूर, ता. २ (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुरबाड विधानसभा समन्वयकपदी कालिदास देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या महामेळाव्यात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते महेश तपासे यांनी कालिदास देशमुख यांना हे नियुक्तीपत्र प्रदान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने देशमुख यांची विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्ती केली. या महत्त्वाच्या जबाबदारीनंतर मुरबाड विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया कालिदास देशमुख यांनी दिली. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना मोठ्या मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही कालिदास देशमुख यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com