अपक्ष उमेदवारांसाठी कायपण; आयोगाकडून १९० चिन्हे जारी

अपक्ष उमेदवारांसाठी कायपण; आयोगाकडून १९० चिन्हे जारी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईसह महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच छोट्या-मोठ्या पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांकडून अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानेही अपक्षांबरोबरच अधिकृत निवडणूक चिन्ह नसलेल्या उमेदवारांसाठी कायपण म्हणत तब्बल १९० निवडणूक मुक्त चिन्ह जारी केली आहेत. त्यामध्ये एसी, कुलर, जहाज, टेलिफोन, रोड रोलरबरोबरच संसारोपयोगी विविध साहित्य, फळे अशा चिन्हांचा समावेश आहे. एकापेक्षा एक सरस निवडणूक चिन्ह असल्याने उमेदवार कोणत्या चिन्हावर नशीब आजमावणार हे पाहावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस अशा ११ पक्षांकडे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. तसेच इतर लहान पक्षांना आणि अपक्ष उमेदवारांना अधिकृत चिन्ह नसल्याने निवडणूक आयोगाकडून त्यांच्यासाठी वेगवेगळी चिन्हे जारी केली जातात. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी १९० वेगवेगळी मुक्त चिन्हे जारी केली आहेत.
-----------------------------
रिक्षा, गॅस सिलिंडर, टीव्हीला मोठी मागणी
ज्या पक्षांना अधिकृत निवडणूक चिन्ह नाही किंवा अपक्षांना उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोगाने जारी केलेल्या मुक्त चिन्हांमधून तीन चिन्हे निवडावी लागतात. त्यामध्ये पहिल्या पसंतीचे चिन्ह म्हणून उमेदवारांकडून रिक्षा, गॅस सिलिंडर आणि टीव्हीला मोठी मागणी असल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उर्वरित उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com