विशेष विद्यार्थ्यांकडून रॅलीव्दारे मतदान जनजागृती

विशेष विद्यार्थ्यांकडून रॅलीव्दारे मतदान जनजागृती

विशेष विद्यार्थ्यांकडून रॅलीद्वारे मतदान जनजागृती
वाशी, ता. २ (वार्ताहर) : नवी मुंबई महापालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा-सुविधा केंद्राने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मतदार जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. यावेळी विशेष विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच दिव्यांग व्यक्ती आणि शिक्षक यांनी जनजागृतीपर रॅलीत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.
सध्या लोकसभा निवडणुका होत असून भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, याकरिता ठिकठिकाणी जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत. नागरिकांनी मतदान करावे, याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून विविध माध्यमांतून अनेक लोकप्रिय व्यक्तीही प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन करीत आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा- सुविधा केंद्रानेही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या मतदार जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. यावेळी विशेष विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच दिव्यांग व्यक्ती आणि शिक्षक यांनी जनजागृतीपर रॅलीत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड तसेच ईटीसी केंद्र संचालक तथा उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली ईटीसी केंद्र इमारतीपासून वाशी रेल्वे स्टेशन परिसरात मतदानाचे आवाहन करणारी रॅली काढण्यात आली. यामध्ये ईटीसी केंद्रातील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच विशेष विद्यार्थी व त्यांचे पालक सहभागी झाले होते. यावेळी ईटीसी केंद्रातील सहशालेय शिक्षकांनी मतदान जनजागृतीचे फलक घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याकरिता घोषणा दिल्‍या. नागरिकांचे लक्ष वेधून घेत त्यांना २० मे रोजी होत असलेल्‍या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले. ईटीसी केंद्राचे शैक्षणिक व्यवस्थापक व अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली या रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com