मतांतरे

मतांतरे

मतांतरे
सामान्य गृहिणींना सध्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या महागाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे कौटुंबिक हिंसाचारातदेखील वाढ झाली आहे. सरकारने महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी कठोर पाऊल उचलणे आवश्यक आहे. शिक्षण घेणे दिवसेंदिवस महागडे होत चालले आहे. पुरेसे शिक्षण घेऊनसुद्धा नोकऱ्या मिळत नसल्यामुळे प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. वाढती बेरोजगारी, वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रात आणि राज्यात चांगले सरकार येणे गरजेचे आहे.
पूनम आगवने, नेरूळ
.......................
सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. प्रामुख्याने सरकारने रोजगाराचा आणि वाढत जाणाऱ्या महागाईचा मुद्दा अग्रक्रमी घ्यायला हवा. मुलांच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होत चालला आहे. तसेच घरगुती हिंसाचाराचा मुद्दा ही गंभीर आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत. सरकारी आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व सर्वसामान्य जनतेला उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, शिक्षणाचे होणारे खासगीकरण, मानसिक आरोग्याचे प्रश्न, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक सुरक्षेच्‍या प्रश्नांवर सक्षम तोडगा काढणे आवश्‍यक आहे. तसेच भविष्यात पाण्याचा प्रश्न बिकट होऊ शकतो, त्‍याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
-विजय सुजाता शांताराम खरात,
सामाजिक कार्यकर्ते, नवी मुंबई
..........................
सरकारी नोकऱ्या राहिल्या नसून खासगी नोकऱ्यादेखील कमी झाले आहेत. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्‍या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या सरकारने सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडले असून सामान्य जनतेच्‍या अडचणी वाढल्‍या आहेत. प्रत्येक वस्तूचे वाढलेले दर कमी करण्यात यावेत. येणाऱ्या सरकारने यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
-यल्लवा रसनबहिरे,
समाजसेविका ऐरोली
............................
दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक बिकट होत चालला आहे. महिलांवर होणारे अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्या दृष्टीने सरकारने ठोस धोरण आखायला हवे. याशिवाय सतत वाढत चाललेली महागाई यावर नियंत्रण आणणे खूप गरजेचे आहे. महागाईमुळे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांचे जगणे असह्य झाले आहे. त्याशिवाय सरकारी रुग्णालयातील आरोग्य सुविधा सुधारणे, सर्वांना शिक्षण मोफत करण्याबरोबरच उच्च शिक्षण घेणाऱ्यांना शासनाने सर्वतोपरी मदत करणे आवश्यक आहे.
-कोमल गायकवाड, गृहिणी, उलवे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com