लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा- नितिन करीर

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा- नितिन करीर

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा
मुख्य सचिव नितीन करीर यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा गाभा असून लोकसहभाग आवश्यक आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी २० मे रोजी मतदान करून उत्साहपूर्वक सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मतदान जनजागृतीविषयक कार्यक्रमात नितीन करीर सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, जल संधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे अपर आयुक्त विकास पानसरे, ‘स्वीप’च्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांच्यासह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन केले.
...
मतदानासाठी सज्ज!
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून मतदारांनीही या प्रक्रियेत मतदार म्हणून सहभागी होणे आवश्यक आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविण्यात येणार आहेत, असे नितीन करीर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com