भाजपकडून महाराष्ट्राचा द्वेष

भाजपकडून महाराष्ट्राचा द्वेष

पालघर, ता. २ (बातमीदार)ः लैंगिक शोषण करणारे खासदार प्रज्वल रेवणना यांच्याबाबतची माहिती असूनही भाजपच्या उच्च पदावरील नेत्याने त्याचा प्रचार करावा, ही एक लांच्छनास्पद बाब आहे. अशा गलिच्छ राजकारण करणाऱ्या पक्षाला महाराष्ट्रात स्थान नसून महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात एकही जागा मिळणार नाही, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालघर येथे केली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे गुरुवारी दुपारी (ता. २) पालघरमध्ये आले होते. यावेळी जे डरपोक होते ते पळून गेल्याने कुठलाही फटका आमच्या पक्षाला बसणार नाही. आम्ही लोकशाही टिकवण्यासाठी लढत आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आमच्या सोबत आहे. तसेच वाढवण बंदराला आमचा विरोध आहे. भाजपला पालघरमध्येही उमेदवार देता आलेला नाही. त्यामुळे ईडी-सीबीआय आता कोणता उमेदवार ठरवते, हे पाहावे लागेल, अशी टीका त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com