पावसाळ्यापूर्वी काँक्रिट रस्त्यांची कामे पूर्ण करा

पावसाळ्यापूर्वी काँक्रिट रस्त्यांची कामे पूर्ण करा

पालिका आयुक्तांचे आदेश, ३९८ किलोमीटर रस्त्यांसाठी कार्यादेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची सुरू असलेली कामे पावसाळ्याआधी म्हणजेच ३१ मेपूर्वी पूर्ण करा, नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण प्रगतिपथावर आहेत. पावसाळ्यापूर्वी काँक्रीट रस्‍ते वाहतूक योग्य स्थितीत ठेवावेत व रस्‍त्‍यांवर आवश्यक त्या ठिकाणी पुनर्पृष्ठिकरण करा, तसेच पावसाळ्यात सुरू राहतील, अशा प्रकारची रस्‍ते काँक्रीटीकरणाची कोणतीही नवीन कामे हाती घेऊ नयेत, कारण त्याचा त्रास नागरिकांना, वाहतुकीला होऊ नये, अशा सूचनाही दिल्या आहेत.
पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर आवश्यक तेथे डागडुजीच्या कामांसाठी कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. महापालिकेच्या सातही परिमंडळांतील विविध रस्त्यांवर मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजी केली जात आहे. काँक्रीटीकरणासाठी ३९८ किलोमीटर रस्त्यांसाठी कार्यादेश जारी केले आहेत. त्यापैकी पश्चिम उपनगरात आणि पूर्व उपनगरात मिळून ३२५ किलोमीटर अंतरापैकी काही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. तर शहर विभागातील एक निविदा रद्द केली आहे.


१४ कंत्राटदार नेमले
बृहन्मुंबई महापालिकेने पावसाळापूर्व रस्त्यांच्या दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजीकरणाची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी सात परिमंडळांत एकूण मिळून १४ कंत्राटदारांची नेमणूक केली आहे.

खड्ड्यांसाठी दुय्यम अभियंत्यांची नियुक्ती-
खड्ड्यांसंदर्भातील तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी या वर्षीही २२७ निवडणूक प्रभागांमध्ये दुय्यम अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे दुय्यम अभियंते प्रत्यक्ष फिरून खड्ड्यांसंदर्भात तक्रारींची स्वतःहून नोंद घेतील. त्यानंतर त्या त्या कंत्राटदारांमार्फत काम पूर्ण केले आहे की नाही, त्याची खातरजमा करून घेणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com