''ईईएसएल मार्ट''कडून किफायतशीर दरात मिळणार ''एअर कुलिंग''

''ईईएसएल मार्ट''कडून किफायतशीर दरात मिळणार ''एअर कुलिंग''

‘ईईएसएल’कडून किफायतशीर दरात मिळणार ‘एअर कुलिंग’

मुंबई, ता. १० : ‘ईईएसएल’ने नुकतेच त्यांचे संकेतस्थळ ‘ईईएसएल मार्ट’ सुरू केले आहे. उद्योगांना आणि घरगुती ग्राहकांना उच्च दर्जाच्या सोयी देण्यात आल्या आहेत. यासाठी आता ईईएसलकडून खास आणि किफायतशीर असे एसी आणि फॅन ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत.

‘ईईएसएल’च्या उत्पादनांमध्ये १.०. टीआर सुपर एफिशियंट ५ स्टार एसी हा इंडियन सीझनल एनर्जी एफिशिएन्सीचं (ISEER) ६.२ रेटिंग आहे. पारंपरिक फाईव्ह स्टार एसीच्या तुलनेत नवीन कार्यक्षम तंत्रज्ञानामुळे ६४० युनिट इतकी वीज वाचवली जाऊ शकते. त्यामुळे पैसे वाचतात आणि पर्यावरणालाही फायदा होतो.

ईईएसलचा सुपर एफिशियन्ट १.५ टनाच्या एसीमध्ये ट्रिपल इन्व्हर्टर तंत्रज्ञान आहे. या एसीला इंडियन सीझनल एनर्जी एफिशिअन्सीचं ५.८ रेटिंग आहे. त्यात सेल्फ क्लिनिंग तंत्रज्ञान असून तांब्याच्या भागांवर एकदम सूक्ष्म कोटिंग आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे वार्षिक पातळीवर ६४० युनिट विजेची बचत होते.

बीएलडीसी सिलिंग फॅन हा अत्यंत बारकाईने तयार केला आहे. या पंख्याचा व्यास १२०० मिमी असून या पंख्यातून दर मिनिटाला २२० क्युबिक मीटर इतकी हवा मिळते.

बीएलडीसी सीलिंग फॅन (रिमोटशिवाय) या पंख्याला भिंतीत बसवलेलं रेग्युलेटर चालते. या पंख्याची सर्व्हिस व्हॅल्यू ७.३३ असून अतिशय सोयीचा आहे. १४० ते २८५ वोल्टच्या दरम्यान तो व्यवस्थित चालतो. वीजपुरवठ्यात काही गडबड झाली तरी तो व्यवस्थित चालतो.
वाढत्या तापमानामुळे एसी आणि पंखे अतिशय गरजेचे असले तरी ही उपकरणे पर्यावरणासाठी आणि तुमच्या खिशासाठीही वरदान ठरू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com