सहा महिन्यांच्या बाळाची २९ लाखांना विक्री

सहा महिन्यांच्या बाळाची २९ लाखांना विक्री

कल्याण, ता. १० (वार्ताहर) : मध्य प्रदेशातून अपहरण झालेल्या सहा महिन्यांच्या बाळाची २९ लाखांना विक्री केल्याच्या गंभीर प्रकरणाची अवघ्या ८ तासांत उकल करत कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका ५३ वर्षीय शिक्षक आणि त्याचा माजी विद्यार्थी, त्याची पत्नीसह आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.
मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्याच्या सिव्हिल लाईन भागातून पदपथावर झोपलेल्या फेरीवाला जोडप्याच्या ६ महिन्यांच्या चिमुरड्याचे अपहरण झाले होते. याबाबत मध्य प्रदेश पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये संशयित आरोपी कल्याणच्या शहाड परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी अपर पोलिस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) यांच्याशी संपर्क करून गुन्ह्याची माहिती दिली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून या प्रकरणात कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी तातडीने तपासासाठी दोन पथके स्थापन केली होती. या पथकाने सीसी टीव्हीच्या साह्याने बाळाचे अपहरण करणारे ४ पुरुष आणि दोघा महिलांना अवघ्या ८ तासांत अटक केली आहे.
----------------------------------------------------
गुन्हेगारांची साखळी
अपहरणकर्त्यांनी कल्याणमध्ये राहणाऱ्या नितीन सोनी आणि स्वाती सोनी ऊर्फ मेहक खान या दाम्पत्याला बाळ दिले होते. त्यामुळे कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतले, पण त्यांनी हे बाळ शेजारी राहणारा रिक्षाचालक प्रदीप कोळंबेला दिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार प्रदीप कोळंबेच्या केलेल्या चौकशीत हे बाळ अमोल येरुणकर आणि त्याची पत्नी अर्वी येरुणकरला देण्यात आले आहे. पोलिसांनी येरुणकर पती-पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर सहा महिन्यांचे बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी पनवेल येथून शिक्षकाला अटक करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com