वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला महिला कामगारांचा विरोध

वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला महिला कामगारांचा विरोध

वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला महिला कामगारांचा विरोध

मुंबई : केंद्र सरकारने वीज कंपन्यांच्या खासगीकरणासाठी वीज कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे भविष्यकाळात सर्व प्रथम वीज कामगाराची पिळवणूक होणार आहे. त्यामुळे वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला कडाडून विरोध कण्याचा निर्णय महिला वीज कामगारांनी घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या माध्यमातून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या वीज कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, अभियंते, अधिकारी प्रवर्गातील महिलांचे राज्यस्तरीय संमेलन नुकतेच नाशिक येथे पार पडले. यामध्ये महिलांनी केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात लढा देण्याचा इशारा दिला. तसेच महावितरणच्या कार्यक्षेत्रात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची फ्रेंचाईझी खासगी कंपन्यांना देणे, याचाही निषेधही करण्यात आला. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्मा, राष्ट्रीय महासचिव निशा शिरूरकर, लता भिसे-सोनवणे, भारती भोयर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com