राजस्थानच्या मुलाचा डहाणूत मृत्यू

राजस्थानच्या मुलाचा डहाणूत मृत्यू

राजस्थानच्या मुलाचा डहाणूत मृत्यू
कासा, ता. १० (बातमीदार)ः डहाणू तालुक्यातील विवढवेढे येथील महालक्ष्मी मातेची पंधरा दिवसांची यात्रा संपलेली आहे. या यात्रेमध्ये वेगवेगळ्या राज्यांतून व्यवसाय करण्यासाठी अनेक छोटे विक्रेते येतात. राजस्थानमधून खेळणी, फुगे विक्रीसाठी आलेल्या एका कुटुंबातील आकाश नामक मुलाचा चारोटी येथील तांडेल पाडा कालव्यावर आंघोळीवेळी बुडून मृत्यू झाला आहे.
कुटुंबासोबत राजस्थानवरून डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मातेच्या यात्रेत आलेला आकाश आंघोळीसाठी चारोटी येथील तांडेल पाडा कालव्यात उतरला होता. दरम्यान, आंघोळ झाल्यानंतर पुन्हा परतीच्या वेळेला सातवर्षीय आकाश सोबत नसल्याचे त्याच्या कुटुंबाच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी कासा पोलिस कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला होता. कासा पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधकार्य सुरू केले होते. अखेर गुरुवारी (ता. १०) संध्याकाळी उशिरा पोलिस, तसेच स्थानिक नागरिकांना आकाशचा मृतदेह ७०० फुटांवर सापडला. यावेळी कालव्याच्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने नागरिकांनी, विक्रेत्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com