म्हाडा व्याजाने मालामाल

म्हाडा व्याजाने मालामाल

म्हाडा व्याजाने मालामाल
वेगवेगळ्या बँकेत १२०० कोटींच्या ठेवी; ८ टक्क्यांचा व्याजदर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : सर्वसामान्यांसाठी घरे बांधणारे म्हाडा प्राधिकरण आता व्याजाच्या पैशांनी मालामाल होणार आहे. म्हाडाने आपल्याकडे असलेल्या सुमारे १२०० कोटी रुपयांचा निधी ठेव स्वरूपात वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवला आहे. त्या मध्यमातून म्हाडाला आठ टक्क्यांहून अधिक व्याज मिळणार आहे. त्यामुळे म्हाडाला व्याजाच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे.
घरांच्या विक्रीच्या माध्यमातून म्हाडाकडे कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होत असला तरी वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या गृह प्रकल्पांवरही तेवढा खर्च करावा लागतो. दरम्यान, सर्व खर्च भागवून शिल्लक राहणारा निधी बँकांमध्ये ठेव स्वरूपात ठेवण्यासाठी बँकांकडून व्याजदराबाबत प्रस्ताव मागवले होते. त्यानुसार आयडीबीआय बँकेने ८.०५ टक्के, तर कॅनरा बँकेने ७.६५ टक्के एवढ्या दराने ठेवींवर व्याज देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे म्हाडाने तब्बल १२०० कोटी रुपयांच्या ठेवी या दोन्ही बँकांसह इतर बँकांमध्ये ठेवल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील वर्षी म्हाडाने ठेव रूपाने केवळ २०० कोटी रुपये ठेवले होते. त्या तुलनेत यंदा ठेवींचे प्रमाण सहा पटीने वाढल्याने व्याज रूपाने मिळणारा परतावाही चांगला मिळणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

..
१७०० कोटी रुपयांचा निधी
म्हाडाने मुंबई आणि कोकण मंडळातील दोन लॉटरीमधील घरांची विक्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे सध्या म्हाडाकडे एकूण १७०० कोटी रुपयांचा निधी आहे; तर राज्य सरकारच्या निर्देशानुसार वेगवेगळ्या मंडळांना, संस्थांना सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यावरून म्हाडाची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे स्पष्ट होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com