const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();
परवडणाऱ्या घराचे स्वप्न साकार

परवडणाऱ्या घराचे स्वप्न साकार

ठाणे, ता. १० (बातमीदार)ः मुंबईतील घरे दिवसेंदिवस महाग होत असल्याने मुंबईलगतच्या डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात नवनवीन प्रकल्प उभे राहत आहेत. या प्रकल्पांना लोकांची पसंती मिळत असल्याने अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कल्याण शीळ फाटा रोड येथेही मध्यमवर्गीयांना परवडेल अशा किंमतीत घरे ‘रिजन्सी अनंतम नेक्स्ट’ या ग्रुपने उपलब्ध करून दिली आहेत.
सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरामध्ये ही घरांचे भाव गगनाला भिडल्या आहेत. अशावेळी स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी अक्षय्य तृतीय्येच्या मुहूर्तावर नवीन गृहप्रकल्पाचे ‘रिजन्सी अनंतम नेक्स्ट’ या ग्रुपने लॉंचिंग केले आहे. या गृहप्रकल्पात डोंबिवलीकरांना ४० लाखात स्वप्नातील घर घेता येणार आहे. डोंबिवली नगरीत हक्काचे घर असावे, अशी इच्छा असणाऱ्यांसाठी आता ‘रिजन्सी अनंतम नेक्स्ट’ हा प्रकल्प चांगला पर्याय आहे. कल्याण-शीळ रोड, डोंबिवली (पूर्व) येथे १७ एकरात पसरलेल्या या प्रकल्पात १ बीएचके २ बीएचके घरे आहेत. तसेच यामध्ये ५० हून अधिक सोई-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तर ओसीवर थेट ५० टक्के भरण्याची ऑफर देण्यात आली आहे. त्याचबरोबर या ग्रुपचे २०१८ च्या लाँचचे मॅजिक परत आणण्याचे उद्दिष्ट आहे.
-----------------------------
आकर्षक किंमतीत सुविधांनी परिपूर्ण
कल्याण-डोंबिवली या शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. तसेच हा प्रकल्प डोंबिवली स्थानक अन् शीळफाटा रोडपासून अधिक जवळच्या अंतरावर आहे. दुसरे म्हणजे या प्रकल्पामध्ये २ बीएचके फ्लॅटसह मध्यमवर्गीयांना परवडतील, अशा आकर्षक किंमतीत वन बीएचके फ्लॅटही विविध सोयी-सुविधांसह उपलब्ध आहेत. या घरांचे सॅम्पल फ्लॅट रेडी असून तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन ही घरे पाहू शकणार आहेत.
--------------------------------------
आमच्या ग्राहकांना त्यांचे स्वतःचे आलिशान घर परवडणाऱ्या किमतीत खरेदी करण्याची संधी देणे. हे साध्य करण्यासाठी, आम्ही आकर्षक पेमेंट प्लॅनसह २०१८ च्या समान किमती सादर केल्या आहेत. जेणेकरून स्वप्नातील घर खरेदी करणे शक्य होईल.
- महेशजी अग्रवाल, (सीएमडी-रिजन्सी ग्रुप)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com