जागा नसल्याने ७७ ठिकाणी तंबूची उभारणी

जागा नसल्याने ७७ ठिकाणी तंबूची उभारणी

प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. १३ : पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण ३३६ सर्विस मतदार आहेत. असे एकूण २१ लाख ४८ हजार ८०० मतदार आहेत. सहा विधानसभा मतदारसंघात एकूण २ हजार २६३ मतदान केंद्र आहे. बोईसर मतदारसंघात काही केंद्रांवर मतदारांची संख्या वाढल्याने पुन्हा सात सहाय्यकारी मतदान केंद्राचा प्रस्ताव या मतदान केंद्रांत आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर ती केंद्र स्थापित केली जाणार आहेत. यातील काही मतदान केंद्र शासकीय व निमशासकीय खासगी जागेमध्ये आहेत. ज्या ठिकाणी काही सोय नाही, अशा ठिकाणी तंबू उभारून मतदान केंद्र तयार केली आहेत. यामध्ये नालासोपारा येथे ४९ आणि वसईत २८ मतदान केंद्र अशी एकूण ७७ मतदान केंद्र ही तंबूमध्ये स्थापित केलेली आहेत.
डहाणू विधानसभा मतदारसंघात ३३०, विक्रमगड ३५३, पालघर ३२२, बोईसर ३९९, नालासोपारा ५११, वसई ३४८ अशी एकूण २ हजार २६३ मतदान केंद्र आहेत. नागरिकांना मतदान करण्यासाठी जवळचे केंद्र असावे, यासाठी कमीत कमी मतदान केंद्रही स्थापित करण्यात आली आहे. यामध्ये डहाणू मतदारसंघात वाकी ब्राह्मण पाडा येथे २९९ मतदार केंद्र आहेत. तर विक्रमगड मतदारसंघात मेढे केंद्रावर २४५, पालघर सूर्यानगर १५०, बोईसर नेवाळे २८१ आणि नालासोपारा अचोले ३५२, वसई २०८ याप्रमाणे केंद्रे आहेत. तर काही केंद्रांवर जास्त मतदार आहेत. डहाणूमध्ये धामणगाव कोमगाव १५४३, विक्रमगड जव्हार १४८०, पालघर आल्याळी १५२६, बोईसर गोखिवरे १७५७, नालासोपारा तुळिंज १६०५, वसई माणिकपूर १४८४ या मतदान केंद्रावर मतदार जास्त आहे.

आदिवासी संस्कृती अवतरणार
पालघर जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती दर्शवणारी केंद्र म्हणून विक्रमगडमधील मतदान केंद्रांवर ७२ कुतुर्विहीर चंद्र बनविण्यात आले आहे. या केंद्रावर पालघर जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती दर्शविण्यात येणार आहे

परधान शील केंद्र
काही मुस्लिम महिला बुरखा घालून येत असल्याने त्यांची ओळख पटण्यासाठी म्हणून परधान शील केंद्र स्थापित केली आहेत. पालघर विधानसभेत दोन, बोईसर चार, नालासोपारा आठ अशी एकूण १४ मतदान केंद्रावर मुस्लिमबहुल मतदार असल्याने या मतदान केंद्रावर मुस्लिम महिला मतदारांची ओळख पटवण्यासाठी परधानशील मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावर महिला ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा तऱ्हेची परिपूर्ण तयारी निवडणूक विभागाने केली आहे.

स्वयंसेवकांची नियुक्ती
प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य केंद्र असणार आहे. सध्या तापमानाचे प्रमाण जास्त असल्याने त्यासाठीही पाण्याची व औषधाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com