माथेफिरू पतीचा पत्नीवर हल्ला

माथेफिरू पतीचा पत्नीवर हल्ला

नेरळ, ता. ११ (बातमीदार)ः सततच्या भांडणामुळे नांदायला तयार नसलेल्या पत्नीवर संतापलेल्या पतीने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणातील आरोपीला नेरळ पोलिसांनी काहीच तासांतच अटक केली.
मूळची हरियाणाची असलेली दिव्या मोहन खुजूर नेरळ शहरालगत असलेल्या उमा नगर येथे वास्तव्यास आहे. दिव्याचे लग्न अजय भिंडलान (सध्या राहणार- मुंबई) याच्याशी झालेय. मात्र, कौटुंबिक वादामुळे दिव्या कंटाळून नेरळ येथे तिच्या माहेरी निघून गेली होती. दिव्याला परत आणण्यासाठी अजय गुरुवारी (ता. ९) दुपारी त्याच्या सासरी गेला होता. यावेळी घरी येण्यास नकार देणाऱ्या दिव्यावर संतापलेल्या अजयने चाकूने वार करायला सुरुवात केली. अजयचे उग्र रूप पाहून रक्तबंबाळ अवस्थेत दिव्याने कसेबसे आईचे घर गाठले. तिची अवस्था पाहता तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच नेरळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने अवघ्या पाच तासांत मुंबई-जोगेश्वरी येथून आरोपीला अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com