गोरेगाव पत्रा चाळीतील लॉटरीधारकांच्या घरांच्या किमती वाढणार

गोरेगाव पत्रा चाळीतील लॉटरीधारकांच्या घरांच्या किमती वाढणार

पत्रा चाळीतील लॉटरीधारकांच्या घरांच्या किमती वाढणार!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : म्हाडाच्या मुंबई मंडळाने गोरेगाव पत्रा चाळ येथील ३०६ घरांसाठी सोडत काढली होती. त्यामध्ये विजेते ठरलेले अद्यापही घरांच्या प्रतीक्षेत असतानाच म्हाडाने आता या घरांच्या किमती वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे आधीच घरे मिळण्यास विलंब झालेल्या विजेत्यांना मोठी आर्थिक झळ बसणार आहे.
म्हाडाने पत्रा चाळीत तब्बल २१ मजली इमारती उभारल्या असून त्यामध्ये तयार झालेल्या सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात काढली होती. त्यामध्ये पात्र ठरलेल्या विजेत्यांना तत्काळ घरांचा ताबा देणे आवश्यक होते. मात्र त्याचवेळी पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पातील गैरव्यवहार उघडकीस आल्याने या प्रकल्पाचे काम अर्धवट राहिले होते. त्यामुळे घरांच्या प्रतीक्षेत असलेले लॉटरी विजेते गेल्या सात-आठ वर्षांपासून घरांच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, म्हाडाने खासगी विकसकाच्या माध्यमातून या इमारतींचे अपूर्ण असलेले काम पूर्ण करून भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या विजेत्यांना लवकरच घरे मिळणार असल्याचे दिसू लागले आहे. त्यातच आता म्हाडाने अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी केलेला खर्च वसूल करण्याकरिता घरांच्या किमती वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत विचारणा केली असता किंमत वाढवली जाणार असली तरी ती खूप जास्त असणार नाही, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com