पोलादपूर तालुक्यात अवकाळीची हजेरी

पोलादपूर तालुक्यात अवकाळीची हजेरी

पोलादपूर, ता. ११ (बातमीदार) : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यासह शहराला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
मागील काही दिवसांपासून तालुक्यामध्ये उन्हाचा पारा भयंकर वाढला होता; मात्र शनिवारी सायंकाळी तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होत पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आंबा व काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच पोलादपूर शहरातील बाजारपेठेमध्ये देखील शुकशुकाट पसरला होता. जोरदार पडलेल्या पावसामुळे पोलादपूर शहरातील काही भागांमध्ये पाणी साचले होते. काही काळ वीजपुरवठादेखील खंडित करण्यात आला होता. सध्या आंबा व काजू पीक चांगल्या प्रकारे तयार झालेले असून आलेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे आंबा व काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com