... तर लोकांची कामे नाही होणार

... तर लोकांची कामे नाही होणार

बोळिंज, ता. ११ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्व, पालघर साधू हत्याकांड; तसेच उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांच्याबाबत भाजप नेते आमदार नीतेश राणे यांनी नालासोपारा येथे शनिवारी (ता. ११) पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी भाजपच्या खासदारांना निवडून दिले नाही, तर लोकांची कामे होणार नाही, असे धक्कादायक विधान केले.
लोकसभा निवडणुकीत पालघरमध्ये तिरंगी लढत होत आहे. त्याच धर्तीवर नीतेश राणे यांनी निवडणुकीच्या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी स्थानिक मुद्द्यांवर चर्चा न करता लव्ह जिहाद, हिंदुत्व; तसेच भाजपचा अजेंडा यावर बोलले. पत्रकारांनी स्थानिक मुद्द्यांबाबत विचारणा केल्यानंतर मी अभ्यास करून नंतर माहिती देईन. माझा अभ्यास नाही, मला माहिती नाही, अशी उत्तरे दिली. ‘तुमची कामे लवकर होण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या. नाही तरच केंद्र व राज्यातून लोकांची कामे लवकर होणार नाहीत. भाजप खासदारांची कामे सहा तासांत, तर इतर उमेदवारांना सहा महिने थांबावे लागेल’, असे धक्कादायक विधान त्यांनी केले. देशांमध्ये सुरू असलेल्या प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा समोर ठेवत भाजपचा अजेंडा हा हिंदू राष्ट्र करणे आहे. त्यासाठी थेट मोदींना मत देणे हाच पर्याय असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. या वेळी त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या घरातूनही कोणी मतदान करणार नाही, असे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com