सेतू सहकाराचा - 
करार करूनही पाणी खर्च 
वाढवल्‍याने काय करावे?

सेतू सहकाराचा - करार करूनही पाणी खर्च वाढवल्‍याने काय करावे?

करार करूनही पाणी खर्च
वाढवल्‍याने काय करावे?
प्रश्न ः मी एका सहकारी संस्थेमध्ये भाड्याने राहतो. मी घरमालकाला म्हणजेच संस्थेच्या सभासदाला दरमहा सात हजार रुपये भाडे देतो. आमच्यात झालेल्या करारानुसार ज्या बाबी आम्ही वापरतो, उदाहरणार्थ वीज, गॅस यांचे शुल्क आम्ही भरतो. संस्थेचा देखभाल व इतर कर, घरमालकाने द्यावेत, असे ठरले आहे. आता उन्हाळा सुरू झाल्याने संस्थेने प्रत्येकी पाचशे रुपये पाणीखर्चात वाढ केली आहे. हे वाढ केलेले पैसे मासिक देयकात संस्था अंतर्भूत करते. घरमालक ते पैसे देण्यास नकार देतो आहे. यासंदर्भात मी काय करावे?
- कुमार केमकर, नवी मुंबई

उत्तर ः अशा प्रसंगात प्रथम घरमालक व भाडेकरू यांच्यामधील करार व त्यामधील अटी-शर्ती यांचे अवलोकन करणे आवश्यक आहे. घरमालक व भाडेकरू यांच्यामधील संबंध, व्यवहार, जबाबदाऱ्या या सर्वसाधारणपणे करारामध्येच स्वयंस्पष्ट असतात. त्यानुसारच घरमालक व भाडेकरू यांना वर्तन करावे लागते. त्यामुळे प्रथम या कराराचे अवलोकन करावे. जर वाढीव पाण्याची रक्कम ही संस्थास्तरावर सर्व सदनिकांकडून घेण्यात येणार असेल तसेच ती मासिक देयकात अंतर्भूत होणार असल्‍यास ती रक्कम घरमालकानेच देणे आवश्यक आहे. आपण ही रक्कम पाणी वापराची म्हणून न पाहता, पाणीटंचाईमुळे संस्थेने पाण्याकरता होणारी एकूण किंमत सर्व सदनिकाधारकांकडून-सभासदांकडून वसूल करण्यात येत आहे, अशा दृष्टीने पाहावे. त्यामुळे ही रक्कम पाणी वापराच्या सदरात न धरता, पाण्याची वाढलेली किंमत या सदरात मोडत आहे. अशा स्थितीत घरमालकाचे वागणे अयोग्य आणि व्यवहारास धरून नाही. यामध्ये करार आणि व्यवहार यांचा प्रश्न आहे, कायद्याचा प्रश्न यात नसून, कायद्याची अडचण येत नाही.

(सहकार कायदा व सहकारी संस्था यासंदर्भातील प्रश्नांसाठी खालील ई-मेलवर संपर्क साधावा.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com