पामबीच मार्गावरील अतिक्रम हटवले

पामबीच मार्गावरील अतिक्रम हटवले

पामबीच मार्गावरील अतिक्रम हटवले
नागरिकांच्या तक्रारीनंतर पालिकेची कारवाई
वाशी, ता. १२ (वार्ताहर) ः पामबीच रोडनजीक असलेल्या एनआरआय संकुलाजवळील डीपीएस शाळेशेजारी अनधिकृतपणे रोपवाटिका बनवण्यात आली होती. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नागरिकांच्या तक्रारीनंतर या रोपवाटिकेवर कारवाई केली.
अतिक्रमण करून सुरू असलेली रोपवाटिका महापालिकेने कारवाई करूनही पुन्हा सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले होते. यासंबंधी नागरिकांनी महापालिकेच्या आयुक्तांना मेलद्वारे संपर्क साधत तक्रार केली होती. पालिकेने तक्रारीला प्रतिसाद देत ही रोपवाटिका हटवली. याबद्दल नागरिकांनी अतिक्रमण विभागाचे आभार मानले आहेत.
पामबीच रोडनजीकच्या एनआरआय संकुलाजवळील ही जागा अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे. अशा जागेवर सुरू असलेले अतिक्रमण हे धोकादायक असल्याचे स्थानिक सांगत होते. ही रोपवाटिका रात्रीच्यावेळी गर्दुल्ल्यांचा अड्डा बनत चालली असून यामुळे स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सुनील अग्रवाल यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ३ मार्च २०२४ रोजी तोडक कारवाई करत सदर रोपवाटिका तेथून हटवण्यात आली होती. मात्र, महापालिका आयुक्तांची बदली होऊन नवीन आयुक्त आल्यापासून रोपवाटिका पुन्हा सुरू झाली.
वाढते अतिक्रमण लक्षात घेता या अतिक्रमण झालेल्या जागेवर एक चांगले फुलपाखरू उद्यान विकसित करण्याची मागणी स्थानिकांकडून महापालिकेकडे करण्यात आली आहे.

रोपवाटिकेवर कारवाई केल्याबद्दल पालिकेचे आभार मानतो. या ठिकाणी एक चांगले फुलपाखरू उद्यान विकसित करावे आणि भविष्यातील अतिक्रमणाला आळा घालावा.
- सुनील अग्रवाल, पर्यावरणवादी कार्यकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com