चार मतदान केंद्रांसाठी आठ बोटी

चार मतदान केंद्रांसाठी आठ बोटी

पालघर, ता. १२ (बातमीदार) : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. काही मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी वाहने जाऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी आठ बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच ४२५ बस, ४३३ जीपचीही व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

बोईसर विधानसभा मतदारसंघातील वाढीव आणि वेती, तर वसई विधानसभा मतदारसंघामधील अर्नाळा किल्ला आणि पाणजू या चार मतदान केंद्रांसाठी राखीव बोट धरून एकूण आठ बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जूनला पालघर येथील सूर्या कॉलनी गोडाऊन येथे करण्यात येणार आहे. नालासोपारा विधानसभेची मतमोजणी करण्यासाठी २८ टेबल, तर उर्वरित विधानसभेच्या मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात येणार आहेत.

मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून जिल्ह्यात तपासणी नाके (चेक पोस्ट) स्थापित करण्यात आले आहेत. ७९ लाख ८७ हजार ३३५ रुपयांचे मद्य, तर एक कोटी सात लाख ६८ हजार ७०० रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. काही रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. मतदान सुरळीत पार पडावे, यासाठी कायदा-सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

११ शस्त्रे जमा
निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हा कार्यक्षेत्रात परवाना नसलेली ११ शस्त्रे आणि पाच काडतुसे जमा करण्यात आली आहेत. जिल्हा कार्यक्षेत्रात १,२९९ बंदूक परवानाधारक आहेत. त्यापैकी १,१२३ परवानाधारकांनी शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा केली आहेत, तर दोन शस्त्रे विविध कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत. १७० शस्त्रांना जमा करण्यापासून विविध कारणांमुळे सूट देण्यात आली आहे, तर चार शस्त्रे जमा झालेली नाहीत.

जप्तीची कारवाई (रुपयांत)
मद्य ७९,८७,३३५
अमली पदार्थ १,०७,६८,७००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com