निवडणूक आयोगाचा कारभार तंत्रज्ञान स्नेही

निवडणूक आयोगाचा कारभार तंत्रज्ञान स्नेही

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : यंदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने तंत्रस्नेही उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल, तर मतदारांना सहजपणे त्याची तक्रार नोंदवता यावी आणि उमेदवारांनाही निवडणूक प्रक्रियेतील सर्व सोपस्कार सहजपणे पार पाडता यावेत, म्हणून निवडणूक आयोगाने मतदार आणि उमेदवारांच्या हाती अत्याधुनिक सहा ॲप दिले आहेत. त्या ॲपचा घेतलेला हा धांडोळा...
.......
मतदारांच्या हाती सी व्हिजिलचे अस्त्र
निवडणूक जिंकण्यासाठी अनेकदा उमेदवार गैरमार्गाचा वापर करतात किंवा आचारसंहितेचे उल्लंघन करतात. त्यावर वॉच ठेवता यावा, सहजपणे तक्रार नोंदवता यावी म्हणून सी व्हिजिल मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. त्याआधारे नागरिकांना सहजपणे एखाद्या घटनेचे चित्रीकरण, छायाचित्र काढून निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवता येते.
- याप्रकरणी सी व्हिजिल अॅपवर आलेली तक्रार अवघ्या १०० मिनिटात नोंदवून घेत त्याची माहिती तक्रारदाराला दिली जाते.
- तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते.
- आचारसंहिता उल्लंघनाचे ठिकाण शोधण्यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर करून तातडीने कारवाई केली जाते.
------------------
सुविधा अॅप
सुविधा अॅप हे निवडणूक काळात उमेदवारांना नामनिर्देशनाबरोबरच वेगवेगळ्या परवानग्या देण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यानुसार उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवण्यासाठी निवडणूक कार्यालयात फेऱ्या न मारता या अॅपच्या माध्यमातून सहजपणे परवान्यासाठी अर्ज करता येतो, त्याची स्थिती जाणून घेता येते.
- सुविधा अॅपमुळे उमेदवाराची वेळेची आणि खर्चाची बचत होत आहे.
- एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या परवानग्या काढता येतात.
--------------
वोटर टर्नआऊट अॅप
मतदान प्रक्रिया सुरू असताना किती टक्के मतदान झाले याची प्रत्येक दोन तासाची आकडेवारी वोटर टर्नआऊट अॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य वापरकर्त्यांना मिळत आहे. राज्य, जिल्हा आणि मतदारसंघाची माहिती याच्या वर सहजपणे मिळत असल्याने त्याचे विश्‍लेषण करणे सोपे जाते. तसेच आपल्याला हवी असलेली आकडेवारी या अॅपच्या माध्यमातून फिल्टर करता येत.
----------------
वोटर हेल्पलाईन अॅप
वोटर हेल्पलाईन अॅपच्या माध्यमातून देशातील मतदारांना सेवा आणि माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हे या अॅपचे उद्दिष्ट आहे. तसेच नागरिक या अॅपच्या माध्यमातून निवडणूक आयोगाशी कनेक्ट राहू शकतात.
- मतदार यादीत नाव शोधणे
- नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज करणे
- मतदार यादीतील नाव हटवणे, त्यामध्ये दुरुस्ती करणे
- मतदान प्रक्रिया, ईव्हीएम, आणि निकालाबाबत असलेल्या शंका विचारणे
- उमेदवाराची माहिती म्हणजे त्याचे शिक्षण, पात्रता, मालमत्ता, गुन्हेगारी प्रकरणे आदी माहिती मिळवता येते
- बीएलओ, ईआरओ आशा निवडणूक अधिकारी- कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता येतो.
----------------
सक्षम अॅप
सक्षम अॅपच्या माध्यमातून दिव्यांग मतदाराला सर्व प्रकारच्या सुविधा घरी बसून मिळवता येतात. त्यानुसार संबंधिताने कोणत्याही निवडणूक सेवेसाठी नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, मतदारसंघ नोंदवणे आवश्यक आहे. त्यामुळे आवश्यक ती मदत बूथ स्तरीय निवडणूक अधिकारी उपलब्ध करुन देऊ शकतात. तसेच मतदानाच्या दिवशी व्हील चेअरसाठी या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीला करणे शक्य होते.
- हे अॅप दृष्टी दोष असलेल्या मतदारांसाठी आवाज सहाय्य प्रदान करते
- श्रवण दोष असलेल्यांना मतदारांना या माध्यमातून स्पीच टू टेक्स्ट असे रूप प्रदान करत असल्याने सदरचा मेसेज काय आहे हे पाहता येते.
- मतदान केंद्राचे ठिकाण, त्याची रचना आणि इतर बाबी मतदारांना या अॅपमुळे सहज समजते.
-------------------
केवायसी ईसीआय अॅप
मतदारांना केवायसी ईसीआय अॅप म्हणजे नो युवर कॅण्डीडेट. यामध्ये आपल्या मतदारसंघात निवडणुकीसाठी उभा असलेला उमेदवार कोण आहे, त्याचे नाव, गाव, मालमत्ता, गुन्हेगारी प्रकरणे, शिक्षण आदी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होतो. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने मतदारांच्या शंका निरसनसाठी १९५० ही हेल्पलाईन सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com