झाड कोसळून चार जण जखमी

झाड कोसळून चार जण जखमी

झाड कोसळून चार जण जखमी
ठाण्यातील खारटन रोड येथील घटना

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ ः अंगावर झाड कोसळल्याने चार जण जखमी झाल्याची घटना ठाण्यातील खारटन रोड येथे घडली. जखमींमध्ये दोन मुलींचा समावेश असून त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहरात झाडांची पडझड होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यात ठाणेकरांना जीवही गमवावा लागला असून लाखो रुपयांच्या मालमत्तांचेही नुकसान झाले आहे. अशीच एक घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या खारटन रोड येथे घडली. येथील फुलांच्या दुकानाशेजारी असलेले झाड अचानक उन्मळून पडले. त्यामुळे दुकानात असलेल्या चार जणांना दुखापत झाली. मेघना अडसुळे (वय ४५), उन्नती अडसुळे (वय १६), सांची अडसुळे (वय १५) आणि उमेश होनमाने (वय ७५) अशी जखमींची नावे आहेत. त्यापैकी सांची हिला मुका मार लागला आहे. सर्व जखमींना कळवा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोचले. त्यांनी जखमींची सुटका करत झाड कापण्यास सुरुवात केली आहे; मात्र पडलेले झाड मोठे असल्याने त्यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाला मदतीसाठी पाचारण केले असून पुढील कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com