सायन-पनवेल महामार्गावर खडी, रेतीचा खच

सायन-पनवेल महामार्गावर खडी, रेतीचा खच

महामार्गावर खडी, रेतीचा खच
‘सायन-पनवेल’वर अपघाताची शक्यता

वाशी, ता. १२ (बातमीदार) ः सायन-पनवेल महामार्गावर रस्त्याच्या कडेला खडी, रेती आणि काचांचे तुकडे मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत. त्यामुळे दुचाकी वाहने घसरून किरकोळ अपघातदेखील घडत आहेत. रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई-पुणे या मार्गाला जोडणारा सायन-पनवेल हा अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे. या मार्गावर दिवसाला लाखो वाहने ये-जा करीत असतात. दिवसेंदिवस वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे महामार्ग अपुरा पडू लागल्याने होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरण करताना या महामार्गावर उरण फाटा, नेरूळ, जुईनगर आदी भागांत उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्याची स्वच्छता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे; पण या महामार्गावर नेहमी कचरा, रेती, माती पसरलेली आहे. या महामार्गावरील उरण फाटा येथून जेएनपीटी बंदराकडे दररोज हजारो जड-अवजड वाहने ये-जा करतात. त्यामुळे उरण उड्डाणपुलाखालीदेखील वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. महामार्गावरून रेती, खडी वाहून नेणाऱ्या डम्परमधून पडणारी रेती, खडी वाहनाच्या ये-जा करण्याने रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर साचली आहे. तसेच महामार्गावर होणाऱ्या अपघातांत वाहनांच्या फुटणाऱ्या काचा, तसेच वाहनामध्ये मद्यपान करून रस्त्यावरच फेकण्यात येणाऱ्या मद्याच्या फुटलेल्या रिकाम्या बाटल्यांच्या काचादेखील या रेती-खडीमध्ये मिसळल्या आहेत. महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे दुचाकी वाहनस्वार रस्त्याच्या एका कडेने जात असतात, तसेच या महामार्गावरील विद्युत दिवे अनेक वेळा बंद असल्याने रात्री काळोख पसरलेला असतो. काळोखात रस्त्याच्या कडेला असलेली रेती, खडी आणि काचेचे तुकडे वाहनचालकांना स्पष्ट दिसत नसल्याने यावरून दुचाकी गेल्यास घसरून यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत. तसेच सध्या वाढलेल्या खडी आणि रेतीच्या ढिगांमुळे अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. खडी, रेतीच्या पसरण्यामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
...
मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाची
रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. नवी मुंबई महापालिकेने सायन-पनवेल महामार्गाच्या साफसफाईबाबत हा रस्ता आमच्या मालकीचा नसल्याचे स्पष्ट करत फलकदेखील लावलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अश्विनी गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com