निवडणूक कामासाठी नऊ हजार एसटीचे बुकींग

निवडणूक कामासाठी नऊ हजार एसटीचे बुकींग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे यंत्र, साहित्य व मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याचे आणि निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना परत घेऊन आणण्याची जबाबदारी राज्य परिवहन (एसटी) महामंडळावर सोपविण्यात आली आहे. यासाठी एसटी बसचे आरक्षण करण्यात आले असून, राज्यातील पाच टप्प्यांतील मतदानासाठी सुमारे नऊ हजार एसटी बस धावत आहेत.
राज्यातील अनेक मतदार मतदान करण्यासाठी शहरातून आपापल्या मतदारसंघात बसने प्रवास करत आहेत. अनेकांनी यासाठी तिकिटाचे आरक्षणदेखील केले. यापैकी अनेक बस स्थानकात आलेल्या नाहीत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. आगार व्यवस्थापनाकडून बस मतदानाच्या कामाला गेल्याचे सांगितले जात आहे. आरक्षण केल्यानंतर बस रद्द करणे हे मतदान करायला जाणाऱ्या प्रवाशांची थट्टा करण्यासारखे आहे, अशा शब्दात प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एसटी महामंडळाला प्रत्येक बसमागे २४ ते ३० हजार रुपये मिळणार आहेत. सध्या राज्यात मतदानाचे तीन टप्पे झाले आहेत. राज्यात मतदानाचा चौथा टप्पा १३ मे रोजी पार पडणार आहे. तर पाचव्या टप्प्यात २० मे रोजी एकूण १३ मतदारसंघांत मतदान होत असून, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी १२७ बसचे आरक्षण करण्यात येणार आहे.
----
पुणे ते संगमनेर जाण्यासाठी मी पत्नी आणि नऊ महिन्यांच्या बाळासह ६.३० वाजता बससाठी वेळेपूर्वी येऊन थांबलो होता. आरक्षण करूनसुद्धा गाडी आलीच नाही. त्यामुळे त्यांनी ८.१५ वाजता दुसऱ्या गाडीची व्यवस्था केली. त्या गाडीत जागा नसल्याने मोठी गैरसोय झाली.
- प्रवीण शिंदे, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com