मुंबईत आजपासून गृहमतदान

मुंबईत आजपासून गृहमतदान

मुंबईत आजपासून गृहमतदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबई शहर व उपनगरात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यातच याठिकाणी गृहमतदानाची सोमवारी (ता. १२) सुरुवात होणार आहे. मुंबई उपनगरात चारही मतदारसंघात २,७२८ मतदारांनी गृहमतदानाला पसंती दिली आहे. तर मुंबईत ६००हून अधिक गृहमतदान पार पडणार आहे.

निवडणूक आयोगाकडून ८५ वर्षांपेक्षा अधिक आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यास अनुसरून दोन हजार ७२८ मतदारांनी गृहमतदानाचा पर्याय निवडला आहे. यामध्ये मुंबईत ६०० हून अधिक जणांनी गृहमतदानासाठी नोंद केली आहे. उपनगर जिल्ह्यात सध्या विधानसभा मतदारसंघनिहाय गृहमतदान नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात २,७२८ मतदारांनी गृहमतदानाचा पर्याय निवडला आहे; परंतु मतदानावेळी अत्यावश्यक ठिकाणी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे गृहमतदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


ज्येष्ठांची सर्वाधिक संख्या असलेले मतदारसंघ
मुंबई
मलबार हिल : १०,९४०
कुलाबा : ८,३५४
माहीम : ७,५५१
भायखळा : ५,५९७
मुंबादेवी : ६,७९९

मुंबई उपनगर
वांद्रे (पश्चिम) : ७,९७१
विलेपार्ले : ७,६५०
अंधेरी पश्चिम : ७,४६९
गोरेगाव : ६,९९२
चेंबूर : ४,८११
घाटकोपर पश्चिम : ४,७०४
दहिसर : ४,१२५

सर्वात कमी
दिंडोशी : ६९४
अणुशक्ती नगर : ५६४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com