भूमी, परंपरा, जिवंत समाजाने राष्ट्र बनते

भूमी, परंपरा, जिवंत समाजाने राष्ट्र बनते

भूमी, परंपरा, जिवंत समाजाने राष्ट्र बनते
स्वामी गोविंद गिरी महाराजांचे प्रतिपादन

ठाणे, ता. १२ (बातमीदार) ः भूमी, परंपरा आणि जिवंत समाजाने राष्ट्र बनते. भारत हे सनातन राष्ट्र आहे. या राष्ट्राचे डीएनए धर्मात असून भगवान श्रीराम याचे प्रतीक आहेत. राम हे विजयाची प्रतिकृती असल्याने रामाच्या भरवशावरच राष्ट्राची पुन्हा निर्मिती होऊ शकते, असे प्रतिपादन पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले.
‘अखंड भारत व्यासपीठ’ आणि ‘परम मित्र पब्लिकेशन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त डॉ. अशोकराव मोडक आणि डॉ. प्रशांत धर्माधिकारी लिखित ‘अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद’ या ग्रंथाचे प्रकाशन १२ मे रोजी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. गोविंद गिरी महाराज पुढे म्हणाले की, एका चहावाल्याने विश्वातील लोकांना पुन्हा दिल्लीत स्थान दिले, सर्व लोकांना एकत्रित जोडले. आत्मविश्वास गमावून बसलेला हा समाज लोकांच्या श्रद्धा परंपरेतून टिकला पाहिजे. हिंदवी स्वराज्य याचे वाकडेतिकडे अर्थ घेऊ नका. हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदू साम्राज्य आहे. चुकीने लोकांना हिंदू राष्ट्र आणि हिंदू साम्राज्य यातले अंतर समजत नाही. त्यामुळे यातील अंतर लोकांना समजायला हवे. आपल्याला हिंदू राष्ट्राची नव्हे; तर रामराज्याची स्थापना करायला हवी. ते पुढे म्हणाले, राम आयेंगे म्हणत म्हणत २२ जानेवारी हा इतिहासाचा सुवर्णक्षण झाला. राम मंदिर हेच राष्ट्र मंदिर आहे. या मंदिरावर, मंदिरातील रामावर सर्व लोकांची श्रद्धा आहे. राम मंदिर हे जन्मभूमीवरचे मंदिर आहे.
...
समाज घडला पाहिजे!
राष्ट्रासाठी आपल्या पूर्वजांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण झाली पाहिजेत, ती साकारता आली पाहिजेत, त्यासाठी आकांक्षा मोठ्या असाव्यात. सर्वांना देशावरती प्रेम करता आले पाहिजे. या देशातील शिकलेला माणूस कर्तव्यनिष्ठ नाही. यासाठी समाज घडला पाहिजे. राम मंदिराकडे वाकड्या दृष्टीने कोण पाहणार नाही, असा पुरुषार्थ असायला पाहिजे, अशा भावना पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com