उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी काय केले?

उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी काय केले?

मुंबई, ता. १२ : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मुंबईवर २५ वर्षे सत्ता आहे. या कालखंडात मुंबईसाठी काय केले, याचा लेखाजोखा सादर करावा, असे आव्‍हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. मोडकळीला आलेल्या इमारती, कोळीवाडे यातील नागरिकांना आम्ही सुविधा दिल्या, असा दावाही त्यांनी केला.

मुंबईतील साकीनाक्यात भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम, तर विक्रोळीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. या वेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ‘‘देशाच्या सीमा सुरक्षित राहाव्यात, यासाठी सरकारने कायम सावध असणे गरजेचे असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात हे भान कायम ठेवले गेले आहे. उज्ज्वल निकम यांच्यासारखा ज्येष्ठ विधिज्ञ रिंगणात उतरला आहे, त्याला मत द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
-------
प्रगतीसाठी भाजपला मत द्या
प्रत्येक निवडणुकीत मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, अशी आवई उद्धव ठाकरे उठवतात, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देशाला अतिरेकी हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी प्रयत्न झाल्यानेच नागरिक सुखी झाले. त्यामुळे भाजपला प्रगतीसाठी मत द्या, असे आवाहन त्यांनी केले.
---


---
मोडकळीला आलेल्या इमारती, कोळीवाडे यातील नागरिकांना आम्ही सुविधा दिल्या, असा दावाही त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com