उद्धव ठाकरे यांचा मोदी यांच्यावर अदाणी , अंबानीवरून हल्लाबोल ...

उद्धव ठाकरे यांचा मोदी यांच्यावर अदाणी , अंबानीवरून हल्लाबोल ...

उद्धव ठाकरे यांचा मोदी यांच्यावर अदाणी, अंबानींवरून हल्लाबोल

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १२ : पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला उद्योगपती अदाणी-अंबानींकडून गाडी भरून पैसे पाठवण्यात आले आहेत का, असा सवाल केला होता. त्यामुळेच राहुल गांधी यांनी अदाणी-अंबानी यांचे नाव घेणे बंद केल्याचे म्हटले होते. मोदींच्या या भाषणाचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला गाडी भरून पैसे अदाणी-अंबानी यांनी पाठवले असतील, तर ईडी, सीबीआय चौकशी करण्याचे आव्हान दिले. ठाकरे यांनी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

कोरोना, हिंदुत्व, अदाणी-अंबानी पैसा, मोदींची १० वर्षांची कारकीर्द, नकली शिवसेना आदी विविध मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी मोदींवर पलटवार केला. ते म्हणाले, की ईडी-सीबीआयवाले काय करत आहेत. ईडी-सीबीआयची चौकशी लावा ना, असे आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिले. तसेच, तेव्हा ईडी-सीबीआय काय करत होते, चुना लावून बसले होते का, का ठेल्यावर ईडी, सीबाआयवाले चकना घेऊन बसले होते, असा प्रतिसवाल उद्धव ठाकरेंनी मोदी यांना केला.
ते म्हणाले, की मोदीजी तुम्ही पेपर हाती घेऊन उभे राहा, २०१४ आणि २०१९ मध्ये तुम्ही दिलेली किती वचने पूर्ण केली, हे वाचून सांगा. मोदी सरकार हे गजनी सरकार आहे, २०१४ आणि २०१९चे यांना काहीच लक्षात राहत नाही, असा टोलाही ठाकरेंनी लगावला. हिंदू-मुस्लिम ही नौटंकी बस करा, कोण मटण खातोय, कुणाला किती मुले आहेत, हे पंतप्रधानांचे काम आहे का, असा सवालही त्यांनी केला.

भाजपला मुले होत नाहीत, त्यात आमचा काय दोष? आमची लेकरे खेळवायला नेत आहात. मला नकली संतान म्हणता. मग उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी मला २०१४ मध्ये वाराणसीला का बोलावले होते? त्या वेळी मी कोणाचा मुलगा आहे, हे तुम्हाला माहिती नव्हते का?
- उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com