गांजा तस्करीप्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

गांजा तस्करीप्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

ठाणे, ता. १३ (वार्ताहर) : मिरा रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कीर्ती जिशोर सचदे (२६) याला मिरा रोड पोलिसांनी गांजा तस्करीप्रकरणी १ मे २०२१ रोजी अटक केली होती. या खटल्याच्या अंतिम सुनावणीवेळी एनडीपीएस विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. आर. देशपांडे यांनी सरकारी वकील रेखा हिवराळे यांच्या युक्तिवाद आणि सादर पुरावे ग्राह्य धरीत कीर्ती सचदे याला गुरुवारी (ता. ९) रोजी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि दहा हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे; मात्र आरोपीला अटक करून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने दहा हजारांचा दंड भरून त्याची मुक्तता होईल. जर दंडाची रक्कम न भरल्यास ३० दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे.

गांजा तस्करीप्रकरणी मिरा रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस नाईक संतोष पाटील यांना एका व्यक्तीकडे गांजा आढळला. त्याची चौकशी केली असता कीर्ती सचदे असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. त्याच्याविरोधात मिरा रोड पोलिस ठाण्यात गांजा तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर सदर प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कीर्ती सचदे हा बंदिस्त होता. ९ मे रोजी याप्रकरणी अमली पदार्थविरोधी विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. आर. देशपांडे यांनी कीर्ती सचदे याला दोषी ठरवत तीन वर्षांचा कारावास आणि १० हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. दरम्यान, सचदे याला मिरा रोड पोलिसांनी १ मे २०२१ रोजी अटक केली, त्यानंतर निकालापर्यंत तो बंदिस्त होता. त्यामुळे शिक्षेच्या कालावधीपेक्षा नऊ दिवस कीर्ती सचदे हा बंदिस्त असल्याने केवळ १० हजार रुपयांचा दंड भरून त्याची मुक्तता होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com