मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती कंबर कसली

मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती कंबर कसली

डोंबिवली, ता. १३ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील एक प्रमुख आणि सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी महायुतीच्या सर्वच घटकपक्षांनी कंबर कसली आहे. येत्या २० मे रोजी या ठिकाणी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्याला आता अवघा काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यासाठी सर्वच जण मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत. कल्याण पश्चिम विधानसभा हा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एक प्रमुख आणि निर्णायक मतदारसंघ संघ आहे. त्या‍ पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आमदार विश्र्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सापर्डे, वाडेघर, उंबर्डे, गांधारी, कोळीवली आदी सर्व गावे आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात एकत्रितपणे प्रचाराला जोरदार सुरुवात झाली. या दरम्यान नागरिकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेत मतदान जनजागृती केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com