नालेसफाई करताना भिंत 
पडून कामगाराचा मृत्यू

नालेसफाई करताना भिंत पडून कामगाराचा मृत्यू

घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) : नालेसफाईचे काम सुरू असताना अंगावर भिंत पडून पालिकेच्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळीमध्ये उघडकीस आली आहे. आकाश कदम असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पार्कसाईट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली.
पार्क साईट वसाहतीलगत हिरानंदानी संकुल असून १० मे रोजी सकाळी येथील नाल्याच्या सफाईचे काम सुरू होते. आकाश कदम, शंकर फुले, आकाश अहिरे, अविनाश कदम आणि बाळा दावजी हे कामगार साफसफाईचे काम करत असताना अचानक नाल्याजवळील रिकाम्या घराची भिंत आकाशच्या अंगावर कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली तो दबला गेला होता. इतर कामगारांनी काही लोकांच्या मदतीने आकाश याला ढिगाऱ्याखालून काढले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत आकाश याच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून चौकशी सुरू आहे. अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती घाटेकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com