अ

नव मतदार
प्रज्योत उद्धव कदम - उत्तम काम करणारे नेतृत्व निवडून यावे याकरिता मी आज माझे मोलाचे पहिले मतदान केले आहे. मतदानाची प्रक्रिया पाहत असताना पहिला अनुभव खूप चांगला होता.
.............................
आरती कदम- लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होत असताना एक वेगळाच आनंद होता. या उत्सवामध्ये आपले मत बजावून देशाला उत्तम नेतृत्व मिळण्याकरता आज मी पहिले मतदान केले. मतदान करत असताना मनामध्ये एक वेगळीच भावना होती. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर देशासाठी काहीतरी केल्याचा आनंद वाटत आहे.
..............
सुशांत शेवाळे - आज पहिल्यांदा मतदान केले. मतदानाची पूर्ण प्रक्रिया खूप सोईस्कर आणि सुरक्षित होती. मतदान करणे हा आपल्या सर्वांचा अधिकार आणि कर्तव्य आहे. माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी मतदान केलेच पाहिजे, कारण आपले भविष्य आपल्याच मतावर अवलंबून आहे.
..............
यशश्री जाधव- माझे पहिले मतदान करून माझा लोकशाही हक्क बजावला. आपल्या राष्ट्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी योगदान देणे हा एक विशेषाधिकार आहे आणि मी प्रत्येकाला या आवश्यक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com