पूर्व द्रुतगती अवजड वाहनांना बंदी

पूर्व द्रुतगती अवजड वाहनांना बंदी

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १३ : लोकसभा निवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान आणि ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. जोगेश्वरी वाहतूक विभागाच्या हद्दीत पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय व नेस्को प्रदर्शन सेंटर या ठिकाणी स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्र उभारण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी मतपेट्या विनाअडथळा पोहोचवण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. १९ मे, २० मे आणि ४ जून या दिवसांसाठी सर्व प्रकारची अवजड वाहने आणि खासगी बसवर बंदी घालण्यात आली आहे. शंकरवाडी ते दहिसर चेकनाक्यापर्यंतच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवर सर्व प्रकारची अवजड वाहने आणि खासगी बसना प्रवेश करण्यास व रस्त्यांवर धावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
-----
निर्बंधांचा कालावधी
दिनांक : वेळ
१९ मे : सकाळी ६ ते दुपारी १२
२० मे : सकाळी ६ ते संध्याकाळी ७
४ जून : संध्याकाळी ६ ते मध्यरात्री १२
-----------------
अत्यावश्‍यक वाहनांना सूट
भाजीपाला, दूध, बेकरी उत्पादने, पिण्याचे पाणी, पेट्रोलियम उत्पादने, रुग्णवाहिका, सरकारी आणि निमसरकारी वाहने आणि स्कूल बस तसेच निवडणूक कामकाजाकरिता वापरात येणारी वाहने यांसारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com