सफाळा येथे गारांचा पाऊस

सफाळा येथे गारांचा पाऊस

सफाळा येथे गारांचा पाऊस
वसई ता.१३ (बातमीदार) पालघर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने सोमवारी हजेरी लावली. यावेळी वादळी वारा देखील मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने विक्रमगड येथील काही घरांचे नुकसान झाले तर अनेक भागात वृक्ष देखील उन्मळून पडले. सफाळ्याच्या पूर्व भागातील पारगाव आणि बाजूच्या परिसरात गारांचा पाऊस जवळपास २ तास सुरु होता. त्यामुळे काही काळ नागरिकांची पळापळ झाली होती. परंतु कोठेही दुर्घटना अथवा पाणी साचल्याची घटना समोर आले नाही. तलासरीतील कोचाई गावात गारांचा पाऊस झाला.
वाडा, विक्रमगड, डहाणू, मोखाडा, पालघरमध्ये सोमवारी अवकाळी पावसाने ( ता.१३ ) हजेरी लावली. यावेळी सोसाट्याचा वारा देखील सुरू झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. विक्रमगड येघे प्रचंड वेगाने वाहत असलेल्या वाऱ्यामुळे अनेक घरांचे छत उडून गेले. त्यामुळे नुकसान झाले तर रहिवाशांत घबराट पसरली होती. अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील बागायदारांना देखील नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
..
अमित शहा यांचा रस्ते मार्गवरून प्रवास
वसईत प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे हेलिकॉप्टर दाखल झाले होते मात्र हवामान खराब झाल्याने रस्ते मार्गवरून पुढचा प्रवास केला निवडणुकीच्या धामधुमीत अचानक अवकाळी पाऊस व वाऱ्याने उमेदवारांची देखील धावपळ उडाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com