पवई येथे पाणीपुरवठ्यावर परिणाम

पवई येथे पाणीपुरवठ्यावर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पवई येथील २२ केव्ही विद्युत उपकेंद्राचे नुकसान झाले आहे. पवई उदंचन केंद्राला होणारा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या कुर्ला आणि भांडुप विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. विद्युत उपकेंद्राची दुरुस्ती व पवई उदंचन केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर या दोन्ही विभागांत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एस विभागातील मोरारजीनगर, जय भीमनगर, पासपोली गावठाण, लोकविहार सोसायटी, रेनेसन्स हॉटेल परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. महात्मा फुले नगरच्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले.
---
या भागात पुरवठा बंद
एल विभागात काजूपाडा, गणेश मैदान, इंदिरानगर, संगम सोसायटी, शास्त्रीनगर, गॅस कम्पाउंड, चित्रसेन गाव, मसरानी लेन, गाजी दर्गा रोड, ए. एच. वाडिया मार्ग, वाडिया इस्टेट, एम. एन. रोड बैल बाजार, संदेश नगर, क्रांती नगर, एल.बी.एस. कमानी, कल्पना टॉकीज, किस्मत नगर, गफुर खान इस्टेट, संभाजी चौक, न्यू मिल रोड, रामदास चौक, ईगलवाडी, अण्णासागर मार्ग, ब्राह्मण वाडी, पटेल वाडी, एस. जी. बर्वे मार्ग, बुद्ध कॉलनी, न्यू मिल रोड मार्ग विनोबा भावे मार्ग, नावपडा, प्रीमियर रेसिडेन्स, सुंदरबाग, शिव टेकडी संजय नगर,कपाडिया नगर, रूपा नगर, न्यू मिल रोड, ताकिया वॉर्ड, मॅच फॅक्टरी लेन, शिवाजी कुटीर लेन, टॅक्सीमन कॉलनी, इंदिरा नगर, महाराष्ट्र काटा, एल.बी.एस रोड, चाफे गल्ली, चुनाभट्टी, सेवक नगर, विजय नगर आणि जरी मरी माता मंदिर परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com