पाऊस जोड
बेस्ट उशिराने

पाऊस जोड बेस्ट उशिराने

‘बेस्ट’ बसना फटका
मुंबई शहर व उपनगरांत झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. रेल्वे वाहतूक विस्कळित झाल्याने बेस्ट बसकडे लोकांनी धाव घेतली. मात्र, रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याने बसही उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. घाटकोपर येथे रमाबाई नगर येथे होर्डिंग कोसळल्याने पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. रस्ते निसरडे झाल्याने व इतर वाहतूकही धीम्या गतीने सुरू होती. काही ठिकाणी बेस्ट बसेस अडकून पडल्या होत्या.
............
कंत्राटदार बसचालकांचा बस चालवण्यास नकार
अचानक पाऊस सुरू झाल्याने व बहुतेक बसना वायपर नसल्याने कंत्राटदारांच्या बसचालकांची भंबेरी उडाली. त्यामुळे त्यांनी बस चालवण्यास नकार दिला. अखेर बस चालवा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी ताकीद आगार अधिकाऱ्यांना द्यावी लागली. बॅकबे, वरळी, शिवाजीनगर आगारात ही परिस्थिती उद्भवली होती. रात्री उशिरापर्यंत बस सेवा कोलमडलेलीच होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com