मोदींच्या सभेसाठी वाहतुकीत बदल

मोदींच्या सभेसाठी वाहतुकीत बदल

ठाणे शहर, ता. १४ (बातमीदार) : निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण लोकसभा मतदारसंघात येत आहेत. येथील आधारवाडी कारागृह चौकात त्यांची बुधवारी (ता. १५) सभा होणार आहे. या सभेमुळे सामान्य नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये, याची खबरदारी वाहतूक विभागाकडून घेण्यात आली आहे. ठाणे शहर वाहतूक विभागानेही या सभेच्या अनुषंगाने शहरातील वाहतूक मार्गात काही बदल केले आहेत, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
पाचव्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींच्या होणाऱ्या जाहीर सभेसाठी राजकीय पक्षांसह शासकीय यंत्रणांनी चांगली कंबर कसली आहे. तर वाहतूक पोलिसांनीही वाहतूक सुरळीत राहण्यासाठी खबरदारी घेतली आहे. यासाठी वाहतुकीत बदल करून पर्यायी मार्ग सुचवले आहेत. ठाण्यापासून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, मुंब्रा, भिवंडी, कासारवडवली या उपविभागात हे बदल सुचवून प्रवेशबंदी केली आहे. तसेच तेथूनच पर्यायी मार्ग उपलब्ध करून देत वाहतूक सुरळीत ठेवण्याचे पुरेपूर नियोजन केले आहे.

१ - कल्याण वाहतूक विभाग
प्रवेश बंद -
१) नाशिककडून खारेगाव टोलनाका येथून डावे वळण घेऊन मुंब्रा बायपासमार्गे जेएनपीटी तसेच इतर ठिकाणी जाणाऱ्या मार्गावरील सहाचाकी आणि सहा चाकांवरील मालवाहतूक करणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग :
ही वाहने खारेगाव टोलनाका येथून डावीकडे न वळता मुलुंड ऐरोलीमार्गे इच्छितस्थळी जातील.

प्रवेश बंद :
२) नाशिककडून राजनोली येथून डावे व उजवे वळण घेऊन कोनगाव एमआयडीसीकडून दुर्गाडी दिशेने कल्याणकडे येणाऱ्या मार्गावरील सहाचाकी व सहा चाकांवरील मालवाहतूक करणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेश बंद आहे.
पर्यायी मार्ग :
ही वाहने रांजनोली नाका येथून सरळ खारेगाव टोलनाकामार्गे इच्छितस्थळी जातील.

प्रवेश बंद :
३) शिळ कल्याणमार्गे पत्रीपुलाकडे येणाऱ्या सहाचाकी व सहा चाकांवरील मालवाहतूक करणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना बदलापूर चौक येथे प्रवेश बंद केला आहे.
पर्यायी मार्ग :
ही वाहने बदलापूर चौक येथून यू टर्न घेऊन लोवा पलावामार्गे कल्याण महापे आनंदनगर चेकनाकामार्गे इच्छितस्थळी जातील.

प्रवेश बंद :
४) उल्हासनगर शहरातून वालधुनी पुलावरून कल्याण दिशेने येणाऱ्या सहा चाकी व सहा चाकांवरील मालवाहतूक करणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना उल्हासनगर शहरात शांतीनगर जकात नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :
ही वाहने शांतीनगर जकात नाका येथून डावे वळण घेऊन इच्छितस्थळी जातील.

प्रवेश बंद :
५) विठ्ठलवाडीकडून वालधुनी पुलावरून कल्याण दिशेने येणाऱ्या सहाचाकी व सहा चाकांवरील मालवाहतूक करणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकासमोर प्रवेश बंद आहे.
पर्यायी मार्ग :
ही वाहने श्रीराम चौक, उल्हासनगर येथून इच्छितस्थळी जातील.

प्रवेश बंद :
६) मुरबाडवरून शहाड पूलमार्गे कल्याण दिशेने येणाऱ्या सहाचाकी व सहा चाकांवरील मालवाहतूक करणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना म्हारळ जकात नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग :
ही वाहने म्हारळ जकात नाका येथून डावे वळून घेऊन उल्हासनगरमार्गे इच्छितस्थळी जातील.

प्रवेश बंद :
७) नाशिक महामार्गाकडून बदलापूर, नवी मुंबई, पुणे, उरण, न्हावाशेवा येथे जाण्यासाठी पर्यायी मार्गावरून वाहतूक होत आहे. ही वाहतूक बापगाववरून गांधारीमार्गे होत असते. सहाचाकी व सहा चाकांवरील मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना ठाणे ग्रामीण ह‌द्दीतील पडघा पोलिस ठाणे हद्दीतील तळवली चौकी येथे प्रवेश बंद असणार आहे.
पर्यायी मार्ग :
ही वाहने ठाणे दिशेने मार्गस्थ होऊन सरळ मुलुंड-ऐरोलीमार्गे इच्छितस्थळी जातील.


२. कासारवडवली वाहतूक उपविभाग
प्रवेश बंद :
गुजरातकडून पोडबंदर रोडच्या दिशेने ठाणे शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना मनोर टेप नाका, चिंचोटी नाका, फाऊंटन हॉटेल, गायमुख जकात नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग :
ही वाहने मनोर टेप नाका येथून पोशेरी, पाली, वाडानाका, शिरीषपाडा, अबिटघर, कांबरे, पिवळी वेल्हे, दहगावमार्गे वासिंद, शहापूर, किन्हवलीमार्गे माळशेज घाटमार्गे इच्छितस्थळी जातील.

३. मुंब्रा वाहतूक उपविभाग
प्रवेश बंद :
१) महापे नवी मुंबईमार्गे शिळफाटा, (मुंब्रा वाहतूक उपविभाग) ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना शिळफाटा येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग :
ही वाहने ऐरोलीमार्गे इच्छितस्थळी जातील.

प्रवेश बंद
तळोजा नवी मुंबई येथून दहिसर मोरीमार्गे कल्याण फाटा (मुंब्रा वाहतूक उपविभाग) येथून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना दहिसर मोरी येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग :
ही सर्व वाहने पनवेलमार्गे इच्छितस्थळी जातील.

प्रवेश बंद :
३) भिवंडी बायपास खारेगाव टोलनाकामार्गे मुंब्रा बायपासकडे येणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग :
खारेगाव टोलनाका येथून माजिवडा पूलमार्गे इच्छितस्थळी जातील.

४. भिवंडी वाहतूक उपविभाग
प्रवेश बंद :
१) भिवंडी शहरात गुजरात, वाडाकडून येणाऱ्या अवजड वाहनांना नदीनाका येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग :
ही वाहने नदी नाका येथून उजवे वळण घेवून पारोळ रोडने तळवली नाका येथून एकता चौक बंदर, मोहल्ला टिळक चौक, केशरबाग नाका, रईस हायस्कूल धामणकर नाकामार्गे अंजुरफाटा येथून पुढे मानकोलीमार्गे मुंबईकडे इच्छितस्थळी जातील.

५. नारपोली वाहतूक उपविभाग
प्रवेश बंद :
१) गुजरातकडून चिंचोटी नाकामार्गे ७२ गाळा भिवंडी येथून भिवंडी शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना ७२ गाळा येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग :
ही वाहने मनोर टेप नाका येथून पोशेरी, पाली, वाडानाका, शिरीषपाडा, अविटघर, कांबरे, पिवळी वेल्हे, दहगावमार्गे वासिंद, शहापूर, किन्हवलीमार्गे माळशेज इच्छितस्थळी जातील.

६. विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग
प्रवेश बंद :
१) नवी मुंबई, शिळफाटा, खोणीकडून नेवाळी नाकामार्गे कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना नेवाळी नाका येथे प्रवेश बंद केला आहे.
पर्यायी मार्ग :
ही वाहने नेवाळी नाका येथून अंबरनाथ, बदलापूरमार्गे इच्छितस्थळी जातील.

प्रवेश बंद :
२) बदलापूर, अंबरनाथकडून नेवाळी नाकामार्गे कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना नेवाळी नाका येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग :
ही वाहने खोणी फाटा, नावडे फाटा, नवी मुंबईमार्गे इच्छितस्थळी जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com