ठाण्याच्या बाजारात अलिबागचा पांढरा कांदा

ठाण्याच्या बाजारात अलिबागचा पांढरा कांदा

ठाणे, ता. १४ (बातमीदार) : लाल कांद्याबरोबर आता अलिबागचा पांढरा कांदाही ठाण्यातील बाजारात दिसू लागला आहे. अलिबागचा कांदा औषधी आणि गुणकारी असल्याने बाजारात नागरिक आवर्जून खरेदी करत आहेत. अगदी १०० रुपयांपासून पांढऱ्या कांद्याची माळ मिळत आहे.

लाल आणि पांढरा असे कांद्याचे दोन प्रकार आहेत. स्वयंपाकगृहात पदार्थ बनवताना कांदा हा महत्त्वाचा असा घटक मानला जातो. यातला लाल कांदा तर आपण सहसा स्वयंपाकात वापरतोच; पण पांढरा कांदा सहसा स्वयंपाकात वापरला जात नसला, तरी पांढरा कांदा हा कच्चा खाणे आरोग्यास गुणकारी आहे. त्यातच हा पांढरा कांदा बाजारात सध्या दाखल झाला आहे. लाल कांदा हा १२ महिने आपल्याला मार्केटमध्ये विक्रीसाठी पाहायला मिळतो; मात्र उन्हाळ्यात पांढरा कांदा बाजारात दाखल होतो. राज्यात उत्पादित होणाऱ्या कांद्याच्या तुलनेत अलिबागचा पांढरा कांदा वेगळा ठरतो. चव आणि औषधी गुणधर्म यामुळे या कांद्याला मोठी मागणी आहे.

उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त
पोटातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा उपयुक्त ठरतो. अनिमिया दूर होण्यासाठी हा कांदा गुणकारी ठरत असल्याचे सांगितले जाते. कांद्यात चरबीचे प्रमाण नगण्य असते. अॅन्टी ऑक्सिडंट म्हणूनही शरीराला याची गरज असते. बाजारात हे कांदे विक्रीसाठी उपलब्ध असून मोठी माळ २०० ते ३०० रुपयांना; तर छोटी माळ १०० ते १५० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com