मुरबाड मतदारसंघात उमेदवारांची दमछाक

मुरबाड मतदारसंघात उमेदवारांची दमछाक

मुरबाड, ता. १५ (बातमीदार) : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड विधानसभेत सर्वांत जास्त मतदार आहेत. या मतदारसंघातील प्रचाराला सर्व प्रमुख उमेदवारांनी महत्त्व दिले आहे. त्यामुळे प्रचाराने वातावरण ढवळून निघाले आहे. भौगोलिक सीमा फार मोठी असल्याने प्रचारासाठी गावोगाव फिरणे उमेदवारांना त्रासदायक होते. त्यामुळे छोट्या पक्षाचे उमेदवार गावापर्यंत पोहोचतच नसल्याचे दिसून येत आहे.
भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांनी यावेळी उच्चांक गाठला आहे. एकूण २७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र, मागील दोन निवडणुकांप्रमाणे यावेळी तिरंगी लढत होणार आहे. हे उमेदवार प्रचारासाठी सर्वत्र फिरत आहेत. कडक उन्हाचा तडाखा असल्याने सकाळ आणि सायंकाळची वेळ निवडत आहेत. मात्र, तरीही यात त्यांची दमछाक होत आहे. ठाणे जिल्ह्यात मुरबाड विधानसभा मतदारसंघात ५११ सर्वांत जास्त मतदान केंद्र आहेत. तर येथील एकूण ४,३१,६०९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये स्त्री मतदार २,०६,६४१, पुरुष २,२४,९५३, तर इतर १५ मतदार आहेत. ही भौगोलिक सीमा मोठी असल्याने इतर उमेदवार मात्र मतदारांपर्यंत पोहचलेच नाहीत. वेळ कमी असल्याने त्यांना प्रत्येक विभागात फिरणेही कठीण होत आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीवर दृष्टिक्षेप
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी कपिल पाटील (भाजप) यांना ४,११,०७० मते मिळाली होती. ते १,०९,४५० मतांनी विजयी झाले होते. विश्वनाथ पाटील (काँग्रेस) यांना ३,०१,६२० मते मिळाली होती. तर मनसेतर्फे उभे राहिलेले सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना ९३,६४७ मते मिळाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com