आपत्कालिन परिस्थित बेस्ट उपक्रमाची कोंडी

आपत्कालिन परिस्थित बेस्ट उपक्रमाची कोंडी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : बेस्ट कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकरांच्या सेवेत तत्पर असते. अशात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात बेस्टच्या कंत्राटी कामगारांना बस चालविणे कठीण झाले. वादळाचा फटका बसल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळित झाली. त्यामुळे बेस्टवर प्रवाशांचा भार पडला. मात्र कंत्राटी बसचालकांना अशा परिस्थितीत बस चालविण्याचा अनुभव नसल्याने बेस्टची कोंडी झाली.
गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेचा सामना करणाऱ्या मुंबईत सोमवारी सायंकाळी अचानक जोराचे वादळी वारे आणि पाऊस सुरू झाला. त्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली, तर काही झाडांच्या फांद्या रस्त्यात पडल्या. यामुळे रस्ते वाहतूक विस्कळित झाली. आधीच सकाळपासूनच रेल्वे सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळित झाली होती. त्यात सायंकळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे उपनगरीय रेल्वे सेवा कोलमडळी. त्यामुळे प्रवासी वाहतुकीचा अतिरिक्त भार बेस्टवर आला. रेल्वेस्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांनी आपले घर गाठण्यासाठी बेस्टचा पर्याय निवडला. अशा आपत्कालीन परिस्थितीत बेस्टने प्रवाशांच्या सेवेसाठी धावून जायला हवे होते. मात्र बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे त्याचा नाहक त्रास बेस्टच्या प्रवाशांना सहन करावा लागला. रेल्वे प्रवाशी बससाठी धावले, मात्र बस नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
पावसाने कंत्राटी बस चालक बस गाडी चालवू शकले नाहीत. बहुतेक बस गाडीला वायपर नसल्याने कंत्राटदारांच्या बस चालकाची भंबेरी उडाली. पावसाने रस्ते निसरडे झाल्याने गाडी चालविण्याचा अनुभव नसल्याने बस चालक हतबल झाले. त्यामुळे त्यांनी बस चालवण्यास नकार दिला. त्यामुळे बेस्टची आपत्कालीन परिस्थितीत कोंडी झाली. त्यामुळे बस चालवा अन्यथा कारवाई केली जाईल, अशी ताकीद आगार अधिकाऱ्यांना द्यावी लागली. बॅकबे, वरळी, शिवाजी नगर आगारात ही परिस्थिती उद्‌भवली होती.
…...
पूर्व द्रूतगती महामार्गावर बेस्टची कोंडी
घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. रस्त्यालगत हा अपघात झाल्याने अनेक जण गाड्या थांबवून कोसळलेले होर्डिंग पाहत होते. त्यामुळे महामार्गावर वाहनांची कोंडी झाली होती. त्यामुळे बेस्टचे प्रवाशांचा खोळंबा झाला.
….
वादळी वारा आणि अवकाळी पाऊस पडल्यामुळे अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीत बेस्टच्या बसमध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या होत्या. बेस्ट प्रशासनाने त्या तातडीने सुधारल्या आहेत. तसेच
बेस्टच्या सेवेत आता अडथळा निर्माण होणार नाही.
- सुनील वैद्य, जनसंपर्क अधिकारी, बेस्ट उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com