अर्थ - छोट्या गुंतवणुकदारांचा विश्वास जपावा

अर्थ - छोट्या गुंतवणुकदारांचा विश्वास जपावा

छोट्या गुंतवणूकदारांचा विश्वास जपावा
केंद्रीय अर्थमंत्र्यांचे आवाहन
मुंबई, ता. १४ ः अर्थव्यवस्था वाढत असताना घराघरात छोट्या गुंतवणूकदारांनी केलेली बचत ही आता शेअर बाजारात येत असून या त्यांच्या विश्वासाला जपण्याचे काम आपले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येथे सांगितले.
मुंबई शेअर बाजारात ‘विकसित भारत’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अनेक लहान कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने डिमॅट खाती उघडत आहेत. हा त्यांचा शेअर बाजारांवरचा विश्वासच आहे. शेअर बाजारात धोका असला तरीही त्यातून चांगला परतावा मिळेल, ही त्यांची खात्री असून त्याचमुळे ते शेअर बाजारात गुंतवणूक करत असल्याचे सीतारामन म्हणाल्या.
यापूर्वी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांवर शेअर बाजारातील तेजी-मंदी अवलंबून होती. मात्र छोट्या गुंतवणूकदारांचा हा येणारा निधी या परकीय गुंतवणूकदारांच्या तोडीस तोड झाला आहे. त्यामुळे आता परकीय गुंतवणूकदारांच्या लहरीनुसार आपले शेअर बाजार वर-खाली होणार नाहीत. त्यामुळे हा छोट्या गुंतवणूकदारांचा निधी शेअर बाजारात शॉक अॅबसॉर्बर म्हणून काम करीत असल्याचेही अर्थमंत्री म्हणाल्या.
गुंतवणूकदारांच्या या विश्वासाला तडा जाऊ न देणे हे आपले काम आहे. भारतीयांची बचत ही पोस्टाच्या अल्पबचत योजना तसेच बँकातच गेली पाहिजे, असा विरोधी पक्षीयांचा दृष्टिकोन आहे. मात्र आता भारताने तेथून फार मोठी मजल मारली आहे. मध्यम वर्गीयदेखील आता शेअर बाजारातील गुंतवणुकीस उत्सुक आहेत, असेही त्या म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com