दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

घाटकोपर, ता. १४ : होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर येथे अडकलेली वाहने, लोखंडी साहित्य उचलण्याचे काम मंगळवारी दिवसभर सुरू होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका, पोलिस व्‍हॅन, विद्युत जनरेटर वाहने दुर्घटनाग्रस्त ठिकाणच्या परिसरात जागोजागी उभ्या होत्या. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घाटकोपर परिसरात आजही वाहतूक कोंडी कायम होती. त्यामुळे दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दुर्घटना स्थळ हे द्रुतगती मार्गापासून १५ फुटांच्या अंतरावर आहे. माध्यम प्रतिनिधी, नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त आहे. घाटकोपर रेल्वे स्थानक, गरोडिया नगर, पंतनगर, लक्ष्मी नगर, घाटकोपर बस डेपोकडे जाणारे सर्वच रस्ते कोंडीत सापडले आहेत. दहा ते २० मिनिटे वाहने पुढे सरकत नसल्याने दुर्घटना स्थळालगतच्या वसंतराव नाईक मार्गावर चेंबूर आणि मुलुंडकडे जाणाऱ्या वाहनांची दीड किलोमीटरपर्यंत रांग लागलेली दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com