मुंबईत १०२५ होर्डिंग

मुंबईत १०२५ होर्डिंग

मुंबईत १०२५ होर्डिंग
पालिकेला १९७ कोटी महसूल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा होर्डिंग हाही एक स्रोत आहे. मुंबईत एकूण १ हजार २५ होर्डिंग असून त्यापोटी पालिकेला दर वर्षी १९७ कोटी रुपये महसूल मिळतो, अशी माहिती कर निर्धारण आणि संकलन विभागाने दिली.
पालिकेचे चोवीस प्रशासकीय विभाग आहेत. त्यामध्ये अंधेरी पूर्वेत १३४, अंधेरी पश्चिमेत १२२, ग्रॅंट रोड १३१, लोअर परळ १९२ आणि सांताक्रूझ येथे ७७ होर्डिंगना पालिकेने परवानगी दिली आहे. त्या तुलनेत इतर विभागात कमी होर्डिंग आहेत.
प्रकाशमान होर्डिंग ५७३, प्रकाशमान नसलेली होर्डिंग ३८२; तर एलईडी होर्डिंग ७० आहेत. होर्डिंगच्या माध्यमातून दर महिन्याला मोठा महसूल मिळत असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com