पत्नीला नग्न करू, अविवाहित मुलीवर रेप करू!

पत्नीला नग्न करू, अविवाहित मुलीवर रेप करू!

पत्नीला नग्न करू, अविवाहित मुलीवर रेप करू!
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण एटीएसची धमकी, रमेश उपाध्यायचा जबाब
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी रमेश उपाध्याय यांनी विशेष एनआयए न्यायालयात आज (ता. १४) अंतिम जबाब नोंदवला. या जबाबात त्यांनी एटीएसवर गंभीर आरोप केले आहेत. बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आपला शारीरिक तसेच मानसिक छळ केला, इतकेच नव्हे तर गुन्हा कबूल करण्यासाठी पत्नीला नग्न करू, अविवाहित मुलीवर रेप करू, मुलाचा जबडा तोडू, अशी धमकीही अधिकाऱ्यांनी दिल्याचे उपाध्याय याने लेखी जबाबात म्हटले आहे.

मालेगावच्या मशिदीजवळ मोटारसायकलवर २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट होऊन सहा ठार, तर शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले होते. याप्रकरणी विशेष एनआयए न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामधली संशयित आरोपी रमेश उपाध्याय याने येथील सत्र न्यायालयात अंतिम जबाब नोंदवला. चार पानांच्या जबाबात त्यांनी अनेक आरोप केले आहेत. २४ ऑक्टोबर २००८ रोजी एटीएसचे प्रमुख आपल्या घरी येऊन आपल्याला घेऊन गेले. त्यानंतर मुंबईतील काळा चौकी येथे आपल्याला आणण्यात आले. गुन्हा कबूल करण्यासाठी मारझोड केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आपण ज्या बंगल्यात राहत होतो, त्या बंगल्याच्या मालकालादेखील एटीएसकडून झापण्यात आले. त्यावेळी दहशतवाद्याला घरात राहायला का जागा दिली, असा सवालही एटीएसने घरमालकाला केला होता. इतकेच काय तर माझ्या विवाहित मुलींच्या घरांची झडती घेऊन त्यांचा आणि त्यांच्या सासरच्या मंडळींचादेखील एटीएसने अपमान केला. मी न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी केवळ माझ्यावर मानसिक दबाव टाकण्यासाठी अधिकाऱ्यांनी धमकी दिली, असेही त्यांनी म्हटले आहे. तत्कालीन पोलिस महासंचालक ए. एन. रॉय यांनीदेखील आपल्याला धमकी दिल्याचे उपाध्याय याने जबाबामध्ये म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com